सरकारी निर्देशांचे पालन करणार; रिलायन्स इंडस्ट्रीजचे निवेदन 
मुंबई

सरकारी निर्देशांचे पालन करणार; रिलायन्स इंडस्ट्रीजचे निवेदन

रशियाकडून कच्च्या तेलाच्या आयातीवर आणि युरोपला परिष्कृत पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीवर युरोपियन युनियन, ग्रेट ब्रिटन आणि अमेरिकेने अलीकडेच जाहीर केलेल्या निर्बंधांची आम्ही नोंद घेतली आहे.

Swapnil S

मुंबई : रशियाकडून कच्च्या तेलाच्या आयातीवर आणि युरोपला परिष्कृत पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीवर युरोपियन युनियन, ग्रेट ब्रिटन आणि अमेरिकेने अलीकडेच जाहीर केलेल्या निर्बंधांची आम्ही नोंद घेतली आहे. रिलायन्स सध्या या निर्बंधांच्या परिणामांचा तसेच नव्या अनुपालन आवश्यकता यांचा आढावा घेत आहे. आम्ही युरोपमध्ये परिष्कृत उत्पादनांच्या आयातीसंदर्भात युरोपियन युनियनच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करू. या संदर्भात भारत सरकारकडून कोणतेही मार्गदर्शन मिळाल्यास, नेहमीप्रमाणे आम्ही त्याचे पूर्ण पालन करू. रिलायन्सने सातत्याने भारताच्या ऊर्जा सुरक्षेची उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने स्वतःला अनुरूप ठेवले आहे.

कंपनी सर्व लागू असलेल्या निर्बंध आणि नियामक आराखड्यांचे पालन करण्याच्या आपल्या दीर्घकालीन आणि निर्दोष परंपरेबद्दल पूर्णपणे कटिबद्ध आहे आणि या नव्या अनुपालन आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आपल्या रिफायनरीच्या कार्यपद्धतीत आवश्यक बदल करणार आहे.

उद्योगातील प्रचलित प्रथेनुसार, पुरवठा करार बाजारातील आणि नियामक परिस्थितीतील बदल प्रतिबिंबित करण्यासाठी वेळोवेळी बदलत असतात. रिलायन्स हे बदल लक्षात घेऊन आपल्या पुरवठादारांशी असलेल्या संबंधांना जपत काम करेल. रिलायन्सला विश्वास आहे की तिची दीर्घकाळ परीक्षित आणि विविधीकृत कच्चे तेल खरेदी धोरण देशांतर्गत आणि निर्यात गरजा. त्यात युरोपमधील गरजांचाही समावेश आहे. पूर्ण करण्यासाठी तिच्या रिफायनरी संचालनामध्ये स्थैर्य आणि विश्वसनीयता सुनिश्चित करत राहील.”

गोव्याच्या नाईट क्लबमध्ये भीषण आग; २३ जणांचा मृत्यू, घटनेचा थरारक व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद

Mumbai : आंबेडकर स्मारक २०२६ अखेरपर्यंत पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

ऑफिस सुटल्यानंतर 'नो कॉल, नो ई-मेल'; राइट टू डिस्कनेक्ट' विधेयक लोकसभेत सादर

अखेर ट्रम्प यांची इच्छा पूर्ण; बनले जागतिक 'शांतिदूत'; 'फिफा'कडून पुरस्कार मिळवून स्वतःचाच केला गौरव

विमान कंपन्यांच्या मनमानी भाडेवाढीला वेसण; भाडेमर्यादेचे पालन केले बंधनकारक; ८०० विमान उड्डाणे रद्द