मुंबई

अजब पालिकेचा गजब कारभार! CSMT स्थानकाजवळील भुयारी मार्गाची दुरुस्ती; नव्या लाद्या काढून पुन्हा नवीनच लाद्या बसवण्याचे काम

Swapnil S

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाला लागून असलेल्या भुयारी मार्गाची दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे; मात्र हे काम करत असताना नव्यानेच लावलेल्या लाद्या काढून पुन्हा नवीन लाद्या बसवण्याचे काम जोमाने सुरू आहे. त्यामुळे अजब पालिकेचा गजब कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.

मुंबईतील पुलांचे नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणातील अहवालानुसार, काही भुयारी मार्गाची दुरुस्तीची शिफारस करण्यात आली आहे. यात सीएसएमटी स्थानकाजवळील भुयारी मार्गाची दुरुस्ती करण्याचे सुचवण्यात आले आहे. त्यानुसार सीएसएमटी स्थानकाजवळील भुयारी मार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हे काम हाती घेतल्यानंतर नव्यानेच बसवलेल्या लाद्या काढून नवीन लाद्या बसवण्याचे काम जोमाने सुरू आहे. त्यामुळे पालिकेच्या कामकाजावर प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात आहे.

सीएसएमटी स्थानक मध्य रेल्वेच्या स्थानकापैकी सर्वांत महत्त्वाचे स्थानक. याठिकाणी दररोज लाखो प्रवाशांची ये-जा सुरू असते. दक्षिण मुंबईत कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. फोर्ट, नरिमन पॉइंट, कुलाबा आदी ठिकाणी कामानिमित्त येणारे हमखास सीएसएमटी स्थानकाजवळील भुयारी मार्गाचा वापर करतात. पावसाळ्यात या गुळगुळीत लाद्या पादचाऱ्यांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता अधिक आहे.

पावसाळ्यात धोकादायक

सीएसएमटी स्थानकाजवळील भुयारी मार्गातील नव्या लाद्या काढून नवीन लाद्या बसवण्याचे काम सुरू आहे; मात्र नव्याने बसवण्यात येणाऱ्या लाद्या पावसाळ्यात पादचाऱ्यांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. या लाद्या गुळगुळीत असल्याने पावसाळ्यात या लाद्यांवर पाय घसरून अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे एक तर नवीन लाद्या काढत नवीन लाद्या बसवण्याची काय गरज आणि नवीन लाद्या बसवताना पादचाऱ्यांचा विचार का केला नाही, असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे.

कामाचा अहवाल द्या

दरम्यान, सीएसएमटी स्थानकाजवळील भुयारी मार्गाची दुरुस्ती सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या कामाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश पालिकेच्या पूल विभागाने संबंधित ए वॉर्डास सांगितले आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस