उद्धव ठाकरे ANI
मुंबई

उद्धव ठाकरेंकडून लोकसभा मतदारसंघांचा आढावा

प्रतापराव जाधव यांच्या पराभवाचे आवाहन

नवशक्ती Web Desk

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठका घेण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघांच्या आढावा बैठकीसाठी नेतेमंडळी उपस्थित होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विशेषत: बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर विशेष जोर दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांचा पराभव करण्याचे आदेश ठाकरे यांनी यावेळी शिवसैनिकांना दिले.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे सांगत उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्यासोबत राहिलेल्या निष्ठावंतांनी हा बालेकिल्ला शाबूत ठेवावा. इंडिया आघाडीमध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा आपला पक्ष लढवणार आहे. या ठिकाणी शिंदे यांच्यासोबत गेलेल्या प्रतापराव जाधव यांचा पराभव करा आणि या मतदारसंघात आपलाच उमेदवार निवडून आणा. असे सांगून उद्धव ठाकरेंनी कामाला लागण्याचे आदेश शिवसैनिकांना दिले आहेत.

विधानसभेत भाजप उमेदवाराला पाडा!

बुलढाण्यातील विधानसभा मतदारसंघात जिथे भाजपचा उमेदवार उभा राहील त्याचा पराभव करण्याची रणनीती आतापासूनच आखा आणि तयारीला लागा, अशा सूचनाही उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. बुलढाणा लोकसभा मतदारसंघ १९९९ पासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. या मतदारसंघातून सुरुवातीला १९९९ आणि २००४ ला आनंदराव अडसूळ विजयी झाले होते, तर २००९, २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रतापराव जाधव विजयी झाले होते.

पहिल्या टप्प्यात ३२ मतदारसंघांचा आढावा

उद्धव ठाकरेंनी पहिल्या टप्प्यात ३२ मतदारसंघांचा आढावा घेतला होता. ते मंगळवारपासून २६ ऑगस्टपर्यंत मराठवाडा आणि विदर्भातील लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, जालना, संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा या मतदारसंघांचा समावेश आहे.

Union Budget 2026 : मुंबई-पुणे प्रवास होणार सुसाट; नवीन आयकर कायदा १ एप्रिलपासून; अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा एकाच क्लिकवर

भारताच्या 'ऑरेंज इकॉनॉमी'ला मिळाला IIT चा दर्जा! बजेट २०२६ मध्ये क्रिएटर इकॉनॉमीसाठी मोठी घोषणा

Thane : महापालिकेत नवीन समीकरणांची नांदी; स्थायी समिती व स्वीकृत पदांसाठी शिंदेसेना-भाजपमध्ये लॉबिंग

रायबाकिनाला जेतेपद; आर्यना सबालेंकाचा झंझावात रोखला; ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावणारी कझाकस्तानची पहिली टेनिसपटू

Nirmala Sitharaman : यंदाची 'बजेट डे साडी' आहे खास! काय आहेत वैशिष्ट्य? याआधीही नेसल्या होत्या युनिक साड्या; पाहा Photo's