मुंबई

मुंबईतील रस्त्यांची कामे प्रगतिपथावर

स्मूथ, मजबूत व टिकाऊ रस्ते मिळावे, यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून ७८८ रस्त्यांची कामे हाती घेतली होती

प्रतिनिधी

यंदाच्या पावसाळ्यापूर्वी मुंबईकरांना १२८ टिकाऊ व मजबूत रस्ते मिळाले आहेत. तर ४३५ रस्त्यांची कामे प्रगतिपथावर असून, पावसाळ्यानंतर म्हणजेच १ ऑक्टोबरनंतर या रस्त्यांची कामे सुरू करण्यात येतील, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या रस्ते विभागाचे कार्यकारी अभियंता विशाल ठोंबरे यांनी दिली.

स्मूथ, मजबूत व टिकाऊ रस्ते मिळावे, यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून ७८८ रस्त्यांची कामे हाती घेतली होती. शहर व दोन्ही उपनगरात एकूण ७८८ रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत; मात्र पावसाळ्यात रस्त्यांची कामे करणे शक्य नसल्याने आतापर्यंत १२८ रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून, यापैकी बहुतांश रस्ते सिमेंट काँक्रीटचे आहेत. तर काही रस्ते असफाल्टचे आहेत, असेही ठोंबरे यांनी सांगितले. १२८ रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून, त्यापैकी ८३ रस्ते शहरातील, पूर्व उपनगरातील २८ व पश्चिम उपनगरातील १७ रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याचे ठोंबरे म्हणाले.

मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत २,००० किलोमीटरचे रस्ते असून रस्त्यांची देखभाल दुरुस्ती कंत्राटदार व मध्यवर्ती विभागाच्या माध्यमातून केली जातात. मुंबईकरांना दर्जेदार व टिकाऊ रस्ते मिळावे, यासाठी ज्या ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत, त्या ठिकाणच्या कामाचे लाईव्ह प्रक्षेपण रस्ते विभागातील अधिकाऱ्यांना दाखवणे कंत्राटदारांना बंधनकारक आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे रस्ते कामाचा दर्जा राखला जातो का? याची माहिती वेळोवेळी घेण्यात येते. तसेच डांबराचे रस्ते पावसाळ्यात उखडले जात असल्याने यापुढे सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, वाहतूक विभागाची परवानगी मिळण्यात तांत्रिक अडचण असल्याने २१८ रस्त्यांची कामे अद्याप सुरू झाली नसली तरी ऑक्टोबरमध्ये या रस्त्यांची कामे सुरू करण्यात येतील, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

Maharastra Rain: मुसळधार पावसाची शक्यता; ऑरेंज अलर्ट जारी

शाहरुख खान लेकामुळे पुन्हा अडचणीत! समीर वानखेडेंची न्यायालयात धाव, २ कोटींचा मानहानीचा दावा

लडाख आंदोलनाला हिंसक वळण; भाजपचा कॉँग्रेसवर कटाचा आरोप

पुन्हा उभं राहण्याची आशा संपली! धाराशिवमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या; अतिवृष्टीने शेत गेलं वाहून

मुंब्रा-कळवा भागात पाणीटंचाई; पाणीटंचाईबाबत महापालिका मुख्यालयावर धडक; जितेंद्र आव्हाडांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब