तेव्हाही लढलो, आताही तेच करणार : रोहित पवार X | संग्रहित छायाचित्र
मुंबई

तेव्हाही लढलो, आताही तेच करणार : रोहित पवार

संसदेच्या विशेष अधिवेशनात सादर होणाऱ्या लोकसभा मतदारसंघ फेररचना विधेयकाला पाठिंबा देणारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भाजपसोबत सत्तेत जाणार असल्याची चर्चा असताना पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मात्र सत्तेसोबत न जाता विरोधात राहून लढण्याचे संकेत शनिवारी दिले.

Swapnil S

मुंबई : संसदेच्या विशेष अधिवेशनात सादर होणाऱ्या लोकसभा मतदारसंघ फेररचना विधेयकाला पाठिंबा देणारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भाजपसोबत सत्तेत जाणार असल्याची चर्चा असताना पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मात्र सत्तेसोबत न जाता विरोधात राहून लढण्याचे संकेत शनिवारी दिले.

शरद पवार गटाने मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या मुद्द्यावरुन शरद पवार यांच्या पक्षात दोन गट पडले आहेत. एकीकडे सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाचे खासदार या विधेयकाला पाठिंबा देण्याच्या बाजूने असताना रोहित पवार यांनी त्याला विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी भूमिका स्पष्ट करणारी पोस्ट समाज माध्यमात शेअर केली आहे.

२०२३ साली अजित पवारांनी वेगळा निर्णय घेतला, त्यावेळी देखील नातं बाजूला ठेवून विचारांच्या बाजूने लढलो आणि आजही, उद्याही तीच भूमिका कायम असल्याचे रोहित पवारांनी म्हटले आहे.

अजितदादांना जाऊन आज १० महिने पूर्ण झाले. परंतु, अद्यापही त्यांच्या अपघात घातपात प्रकरणात ना एफआयआर झाला ना कुठला तपास झाला. आभाळाएवढा माणूस गेला, पण या घटनेच्या तपासाबाबत कुणालाही सोयरसुतक नाही. बहुतेकांनी सत्यापेक्षा सत्तेला महत्त्व दिल्याचे मी बघितले आणि बघतोय. पण काहीही झाले तरी दादांसाठीचा आणि जनतेसाठीचा आमचा लढा थांबणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुलाला दिलेल्या फ्लॅटचे बक्षीसपत्र रद्द; न्यायालयाने ताबा पुन्हा दिला वडिलांकडे

Mumbai : जेजेमध्ये यकृत, किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मोफत; यंत्रणा कार्यान्वित करण्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

Mumbai : पालिकेच्या जुन्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी सल्लागारांची फौज; पुनर्बांधणी, ऑडिटसाठी ८५ सल्लागारांची नियुक्ती

टाटा सन्सकडून हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल

अंत्योदय योजनेतील मोफत साखरेचा काळाबाजार? सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी