मुंबई

Mumbai : लोकलमध्ये पोस्टरबाजी करणाऱ्या बंगाली बाबाला अटक; वडाळा येथे गुन्हा दाखल, १५ हजार पोस्टर्स जप्त,

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल डब्ब्यांमध्ये जाहिरातीचे पोस्टर्स चिकटवल्याबद्दल एका बंगाली बाबाला आरपीएफ पथकाने अटक केली आहे.

Swapnil S

मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल डब्ब्यांमध्ये जाहिरातीचे पोस्टर्स चिकटवल्याबद्दल एका बंगाली बाबाला आरपीएफ पथकाने अटक केली आहे. या बाबावर विविध कलमांतर्गत वडाळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून जाहिरातीसाठी छापलेले १५ हजार पोस्टर्स जप्त करण्यात आले आहेत.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या आरपीएफ पथकाने १७ फेब्रुवारी रोजी संयुक्त कारवाई केली. यामध्ये बंगाली बाबा म्हणून ओळख असलेल्या एका व्यक्तीला रेल्वे रेकमध्ये आणि रेल्वे परिसरात बेकायदेशीरपणे प्रचार साहित्य चिकटवणे आणि वितरित केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. खबऱ्यांकडून मिळालेल्या गुप्त माहितीवरुन रे रोड परिसरात एक बनावट बाबा कार्यरत असल्याबद्दलचे कळताच रे रोड येथील दारूखाना येथील मीरा अली दर्गा येथे संयुक्त छापा टाकण्यात आला.

या छाप्यादरम्यान मोहम्मद नझीर अंदारी नावाच्या एका आरोपीला अटक करण्यात आली. लोकल डब्बे आणि रेल्वे परिसरात जाहिराती प्रसिद्धीसाठी बनवलेले सुमारे १५ हजार छापील पोस्टर्स त्याच्या ताब्यातून जप्त करण्यात आले. चौकशीनंतर रेल्वे प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता आरोपीने व्यावसायिक उपक्रम राबवण्यासाठी आणि रेल्वेच्या कोचसह रेल्वे परिसराचा प्रचारासाठी वापर करत असल्याचे मान्य केले. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपीच्या सखोल चौकशीत इतर संशयितांचा रेल्वे डब्यांमध्ये प्रचार साहित्य छापण्यात आणि चिकटवण्यात सहभाग असल्याचे उघडकीस आले. संबंधित सहकाऱ्यांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यासाठी तपास सुरू आहे. पोस्टर्स चिटकवणाऱ्या संशयित प्रिंटीग एजन्सी आणि व्यक्तींशी संबंधीत आर्थिक व्यवहारांचेही तपशीलवार विश्लषण करण्यात येत आहे.

...तर कारवाई केली जाईल

अनधिकृत जाहिरात करणे, रेल्वे मालमत्तेचे विद्रूपीकरण करणे आणि त्याचा गैरवापर करणे हे रेल्वे कायद्यांतर्गत दंडनीय गुन्हे आहेत, असे मध्य रेल्वेकडून वारंवार सांगण्यात येते. अशा बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्ती आणि गटांवर कठोर कारवाई केली जाईल.

Mumbai: मध्य रेल्वेकडून १५ डब्यांच्या लोकलची तयारी; टिटवाळा ते वासिंददरम्यान आज रात्री विशेष ब्लॉक

Andhra Pradesh: सेल्फीचा मोह ठरला जीवघेणा; तीन मैत्रिणी धबधब्यात बुडाल्या, Video व्हायरल

ठाण्यात रखडलेल्या प्रकल्पांना मिळणार गती; विकासासाठी पालिकेकडून PPP मार्गाचा अवलंब

कोकणसाठी ४ वातानुकूलित विशेष रेल्वेगाड्या; CSMT आणि मडगाव स्थानकांदरम्यान धावणार

आगामी जनगणना प्रक्रियेच्या अनुषंगाने व्यापक तयारी सुरू; ठाणेकरांनो ३३ प्रश्नांची उत्तरे तयार ठेवा