मुंबई

फोर्टच्या राजाची वृद्ध, अनाथांच्या हाकेला धाव

शालेय विद्यार्थ्यांना भरीव मदत, आरोग्य शिबिरे येथपासून ते सामाजिक जनजागृती करण्यावर भर देणाऱ्या फोर्टचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाने यंदा ६३ व्या वर्षात पदार्पण केले असून हा फोर्टचा राजा वृद्ध, अनाथांच्या, हाकेला वेळोवेळी धावून जात आहे.

Swapnil S

शिरीष पवार/मुंबई

शालेय विद्यार्थ्यांना भरीव मदत, आरोग्य शिबिरे येथपासून ते सामाजिक जनजागृती करण्यावर भर देणाऱ्या फोर्टचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाने यंदा ६३ व्या वर्षात पदार्पण केले असून हा फोर्टचा राजा वृद्ध, अनाथांच्या, हाकेला वेळोवेळी धावून जात आहे.

एकूणच समाजातील दुर्बल, पीडित लोकांचे कष्ट दूर करावेत, त्यासाठी मंडळाचा निधी आणि कार्यकर्त्यांचे श्रम सार्थकी लागावेत, या हेतूने फोर्टच्या राजाची उल्लेखनीय वाटचाल १९६२ पासून सुरू झाली. मंडळाचे धार्मिक देखावे हेसुद्धा भाविकांचे प्रमुख आकर्षण असते. यंदा गुजरातमधील सारंगपूरच्या श्री कष्टभंजन देव हनुमानाची प्रभावळ फोर्टच्या राजासोबत सजली आहे. राजाच्या मंडपात याच कष्टभंजन हनुमानाच्या सहा रूपांचे दर्शन तेथील गाभाऱ्याच्या सजावटीतून दिसते. फोर्टच्या राजाची चित्तवेधक, भव्य मूर्ती साडेचोवीस फूट उंचीची आहे. राजासोबत मागे कष्टभंजन हनुमानाची प्रभावळ लक्षवेधी ठरली आहे. ही मूर्ती निखिल खातू यांनी घडविली आहे. अध्यक्ष अमोल जाधव, उपाध्यक्ष मयूर पटेल, सचिव नयन डुंबरे आदी पदाधिकारी मंडळाची धुरा सांभाळत आहेत.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी