भारतीय चलन बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया २५ पैशांनी मजबूत होऊन ८२.७५ झाला. रुपयाची ८३.२९ या नव्या नव्या नीचांकी पातळीवर रिझर्व्ह बँकेने हस्तक्षेप केल्याचे सांगण्यात येत आहे. अखेरीस रुपया सावरला.
इंटरबँक फॉरेक्स मार्केटमध्ये गुरुवारी स्थानिक चलन ८३.०५ इतका घसरुन उघडला आणि ८३.२९ या नव्या नीचांकी पातळीवर गेला. तसेच तो ८२.७२ जाऊन सावरलाही होता. तथापि, दिवसअखेरीस ८२.७५वर बंद झाला. बुधवारच्या ८३.०१शी तुलना करता रुपया २५ पैशांनी मजबूत होऊन ८२.७५वर बंद झाला.