Mumbai : सिद्धिविनायक भक्तांच्या सेवेत एसी बेस्ट बस  
मुंबई

Mumbai : सिद्धिविनायक भक्तांच्या सेवेत एसी बेस्ट बस

श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी बेस्ट समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव यांच्याकडे विशेष बससेवेची मागणी केली होती.

Swapnil S

मुंबई : श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी बेस्ट समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव यांच्याकडे विशेष बससेवेची मागणी केली होती. त्यांच्या याची दखल घेत आता ‘ए-८१४ श्री सिद्धिविनायक फेरी’ बससेवा शनिवारपासून भक्तांच्या सेवेत दाखल झाली आहे.

दादर स्थानक (प.) ते रवींद्र नाट्यमंदिर ते श्री सिद्धिविनायक मंदिर या मार्गावर ही बस धावणार आहे. यावेळी श्री सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर, बेस्ट समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव, न्यासाच्या विश्वस्त व महिला आघाडीच्या मीना कांबळी व बेस्ट सदस्य उपस्थित होते.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

एका फ्लॅटमुळे संपूर्ण इमारतीचा पुनर्विकास रोखू शकत नाही - मुंबई उच्च न्यायालय

Mumbai : पिसे पांजरपोळ जलबोगद्याला मंजुरी; पाणीगळती, पाणी चोरीच्या घटनांना लगाम

उल्हासनगरात डेंग्यूचा पहिला बळी; १७ वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू