मुंबई

मुलाच्या पासपोर्टवर गेलेल्या प्रवाशाला सहार पोलिसांनी केले अटक

दिलबाग हा मूळचा पंजाबचा रहिवासी असून, त्याला विदेशात फिरण्याची आवड आहे.

प्रतिनिधी

मुलाच्या पासपोर्ट कव्हरवर विदेशात गेलेल्या एका प्रवाशाला सहार पोलिसांनी अटक केली. दिलबाग विजय सिंग असे या प्रवाशाचे नाव असून अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर त्याने पत्नीसह मुलाचे पासपोर्ट फाडले होते, ते पुन्हा जोडताना त्याने मुलाच्या जागी स्वत:चे आणि स्वत:च्या पासपोर्टवर मुलाचे कव्हर लावल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

दिलबाग हा मूळचा पंजाबचा रहिवासी असून, त्याला विदेशात फिरण्याची आवड आहे. लग्नानंतर तो विदेशात गेला नव्हता. मार्च महिन्यांत तो पत्नी अणि मुलासोबत दुबईला गेला. तिथेच त्याचे पत्नीसोबत भांडण झाले होते. त्यामुळे रागाच्या भरात त्याने तिघांचे पासपोर्टचे पाने फाडली होती. काही महिन्यानंतर त्याने स्थानिक रहिवाशांच्या मदतीने तिन्ही पासपोर्ट शिवले. यावेळी त्याने मुलाच्या जागी स्वत:चे, तसेच स्वत:च्या जागी मुलाचे पासपोर्ट कव्हर लावले होते. ही माहिती पासपोर्ट अधिकाऱ्यांना देणे बंधनकार होते; मात्र त्याने ती माहिती पासपोर्ट अधिकाऱ्यांना दिली नाही.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस