Mumbai : साहील वाकोडे मृत्यूप्रकरणी पालकांचे आझाद मैदानावर उपोषण; राहुल गांधींचा वाकोडे कुटुंबाला फोन, आंदोलनाला दिला पाठिंबा 
मुंबई

Mumbai : साहील वाकोडे मृत्यूप्रकरणी पालकांचे आझाद मैदानावर उपोषण; राहुल गांधींचा वाकोडे कुटुंबाला फोन, आंदोलनाला दिला पाठिंबा

आयआयटी बॉम्बेचा विद्यार्थी साहील वाकोडे याच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर कारवाई आणि अटकेच्या मागणीसाठी त्याच्या पालकांनी गुरुवारी संध्याकाळपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

प्रतिनिधी

श्रेया जाचक

मुंबई : आयआयटी बॉम्बेचा विद्यार्थी साहील वाकोडे याच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर कारवाई आणि अटकेच्या मागणीसाठी त्याच्या पालकांनी गुरुवारी संध्याकाळपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

तत्पूर्वी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दूरध्वनीवरून वाकोडे कुटुंबाशी संवाद साधून त्यांना पाठिंबा दर्शवला, तर नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या (एनएसयूआय) कार्यकर्त्यांनी पवईतील आयआयटी बॉम्बेच्या मुख्य प्रवेशद्वारावर तीव्र निदर्शने केली. याप्रकरणी पोलिसांनी अनेक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

साहीलच्या पालकांनी सुरुवातीला आयआयटी बॉम्बेबाहेर आंदोलन करण्याचे नियोजन केले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना भांडुप पोलीस ठाण्यात सुमारे दीड तास रोखून ठेवले. त्यानंतर त्यांना सह्याद्री अतिथीगृहावर नेण्यात आले. तेथे दुपारी ४ च्या सुमारास त्यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाना आणि इतर सदस्यांची भेट घेतली, अशी माहिती कुटुंबाला कायदेशीर मदत करणारे वकील सिद्धार्थ इंगळे यांनी दिली.

वाकोडे कुटुंब गुरुवारी सकाळी यवतमाळमधील वाशिमवरून मुंबईत परतले असून, आदल्या रात्री त्यांना वाशिम येथे नेण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. या बैठकीत पालकांनी प्राध्यापक सूर्यानारायण दुल्ला आणि आयआयटी बॉम्बेचे संचालक शिरीष केदारे यांच्या तात्काळ अटकेची मागणी केली. तसेच प्रकरणाशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज लीक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही इंगळे यांनी केली.

मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा सुरूच

गुन्हे शाखेकडून सुरू असलेल्या तपासाबाबत आयोगाच्या अध्यक्षांनी विचारणा केली असता पालकांनी समाधान व्यक्त केले; तरीही मकवाना यांनी केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) तपासाच्या शक्यतेवर चर्चा केली. मात्र, तपास वर्ग करण्याचा कोणताही निर्णय जाहीर झाला नाही. बैठकीनंतर पालकांनी आझाद मैदानावर आंदोलनासाठी पोलिसांची परवानगी मिळवली आणि सायंकाळी ५.३० च्या सुमारास उपोषणाला सुरुवात केली. मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा सुरूच राहील, असे साहीलचे वडील रवींद्र वाकोडे यांनी स्पष्ट केले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना दिलासा; कलिना भूखंड घोटाळा प्रकरणातून दोषमुक्त

Mumbai : बाप्पा निघाले गावाला; नैसर्गिक व कृत्रिम विसर्जनस्थळी BMC ची जय्यत तयारी

दुष्काळाच्या चर्चेसाठी अधिवेशन बोलवा! उद्धव ठाकरे यांची मागणी

५ राज्यांच्या निवडणुकीत भाजपचा सर्वाधिक खर्च; एकट्या बंगालमध्ये खर्च केले २८६.९९ कोटी रुपये, खर्च विवरणपत्रावरून माहिती उघड

तृणमूल : निर्णयासाठी किती वेळ लागणार