तस्कर सलीम डोला याला ८ मेपर्यंत कोठडी; एनसीबी न्यायालयाचा निर्णय X
मुंबई

Mumbai : तस्कर सलीम डोला याला ८ मेपर्यंत कोठडी; एनसीबी न्यायालयाचा निर्णय

अंमली पदार्थांचा तस्कर मोहम्मद सलीम डोला याला अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) गुरुवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला ८ मेपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे.

Swapnil S

सोमेंद्र शर्मा/मुंबई

अंमली पदार्थांचा तस्कर मोहम्मद सलीम डोला याला अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) गुरुवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला ८ मेपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. 'एनसीबी'ने आंतरराष्ट्रीय आणि भारतीय गुप्तचर संस्थांच्या समन्वयातून 'ऑपरेशन ग्लोबल हंट' अंतर्गत डोलाला तुर्कीयेतून भारतात परत आणले आहे.

एनसीबीने न्यायालयात सांगितले की, मुंबई विभागीय युनिटने ९ जून २०२३ रोजी डोंगरी परिसरात ५ किलो मेफेड्रोन (एमडी) जप्त करून गुन्हा दाखल केला होता. त्यानंतरच्या कारवाईत एनसीबीने डोंगरीतूनच १५ किलो एमडी जप्त केले. दाऊद इब्राहिमशी संबंधित असलेल्या डोलाची आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्कर म्हणून ओळख असून, तो २० किलो मेफेड्रोनचा मुख्य पुरवठादार होता. फैसल जावेद शेख हा या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असून तो डोलाच्या संपर्कात होता आणि जे. जे. रुग्णालयाजवळ अमली पदार्थांचा साठा घेत होता.

फैसल शेखने जबाबातून उघड झाले की, तो डोलाकडून दरमहा सुमारे ४० किलो एमडी प्रति किलो ७ लाख रुपयांना खरेदी करून ८ लाख रुपयांना विकत होता. या सर्व व्यवहारांमध्ये रोकड वापरली जात होती. आर्थिक तपासात फैसल शेखने ६.४० कोटी रुपयांची बेकायदेशीर संपत्ती जमा केल्याचे समोर आले असून, ती 'सफेमा' अंतर्गत गोठवली आहे.

मार्च २०२४ मध्ये भारताच्या विनंतीनुसार डोलाविरुद्ध इंटरपोल रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. डोलाने मध्य पूर्व, आफ्रिका आणि युरोपमध्ये आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करीचे जाळे पसरवले होते. त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमध्ये महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आणि मेथैम्फेटामाइन जप्तीच्या अनेक घटनांचा समावेश आहे.

डोलाविरुद्ध गुजरात एटीएस आणि मुंबई पोलीसही शोध घेत आहेत. याआधी, २०२५ मध्ये डोलाचा मुलगा ताहिल सलीम डोला आणि इतर साथीदारांना मुंबई पोलिसांनी संयुक्त अरब अमिरातमधून प्रत्यार्पणानंतर अटक केली होती.

महिनाभरात चौदा 'बाबां'चा उठला बाजार; 'खरात' प्रकरणानंतर भोंदूंचा बुरखा फाटला; लैंगिक शोषणासह आर्थिक लुटीचे प्रकार उघड

Mumbai : छुप्या शुल्कामुळे ग्राहक आणि रेस्टॉरंट व्यावसायिक त्रस्त; जेवणाच्या मूळ किमतीवर २५ ते ४० टक्के अधिक कमिशन

कुर्ला अपघात : चालकाचा अवजड वाहन परवाना रद्द

Mumbai : मंगळवार, बुधवार पूर्व उपनगरांत पाणीबाणी; जलबोगद्याचे काम, काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार

विधान परिषद निवडणुकीचे नाट्य संपुष्टात; सर्व दहा जण बिनविरोध; पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांचा एकमेव अर्ज