मुंबई

सलमान खानच्या घरात घुसखोरी करणाऱ्यांना अटक

कुख्यात माफिया डॉन लॉरेन्स बिश्णोई याच्याकडून येत असलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा प्रदान करण्यात आलेला अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे (पश्चिम) येथील निवासस्थानी घुसण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी एका तरुणाला आणि एका महिलेला अटक केली आहे. त्यामुळे सलमान खानच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Swapnil S

मुंबई : कुख्यात माफिया डॉन लॉरेन्स बिश्णोई याच्याकडून येत असलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा प्रदान करण्यात आलेला अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे (पश्चिम) येथील निवासस्थानी घुसण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी एका तरुणाला आणि एका महिलेला अटक केली आहे. त्यामुळे सलमान खानच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये या आरोपींनी मंगळवार आणि बुधवारी सलमान खान राहत असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. जितेंद्र कुमार सिंग (२३) आणि ईशा छाब्रिया (३२) अशी त्यांची नावे आहेत. छत्तीसगड येथील रहिवासी जितेंद्र सिंग हा मंगळवारी सकाळी पावणेदहा वाजताच्या सुमारास सलमान खानच्या घराभोवती घुटमळताना दिसला. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका पोलिसाने त्याला तेथून निघून जाण्यास सांगितले, तेव्हा आरोपीने रागाच्या भरात त्याचा मोबाईल फोन जमिनीवर फोडला. तेथून निघून गेल्यावर सायंकाळी सव्वासात वाजता सिंग त्याच इमारतीत राहणाऱ्या एका व्यक्तीच्या कारचा पाठलाग करून गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये घुसल्याने पोलिसांनी त्याला पुन्हा पकडले. वांद्रे पोलिसांनी केलेल्या चौकशीत आपल्याला सलमान खानला भेटायचे होते. मात्र पोलीस त्याला इमारतीत प्रवेश करू देत नसल्याने चोरून आत जाण्याचा प्रयत्न केल्याचे त्याने पोलिसांनी सांगितले.

दुसऱ्या घटनेत ईशा छाब्रिया ही पहाटे साडेतीन वाजता अपार्टमेंटच्या लिफ्टपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाली, असे पोलिसांनी सांगितले. तिला हटकले असता आपण मॉडेल असून सलमान खान याने आपणास बोलवल्याने आपण आलो, असे तिने सांगितले. या दोन्ही आरोपींना अटक करत त्यांच्याविरुद्ध घुसखोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती