मुंबई

समलिंगी दाम्पत्याला अंतरिम दिलासा देण्यास न्यायालयाचा नकार; कायद्याच्या प्राप्तिकर संवैधानिक वैधतेला आव्हान

सध्याच्या तरतुदीमुळे समलिंगी जोडप्यांना आर्थिकदृष्ट्या असमान वागणूक मिळते, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांतर्फे प्राथमिक सुनावणीदरम्यान करण्यात आला.

Swapnil S

मुंबई : प्राप्तिकर कायद्याच्या कलम ५६(२) (एक्स) च्या संवैधानिक वैधतेला आव्हान देणाऱ्या समलिंगी दाम्पत्याला अंतरिम दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. आयकर कायद्यातील कलम ५६(२) (एक्स) नुसार परस्पर लिंगी जोडीदारांमध्ये देवाणघेवाण होणाऱ्या भेटवस्तूंना करमुक्त केले जाते. त्या अनुषंगाने समलिंगी दाम्पत्याने कर लाभांसाठी पती/पत्नी या शब्दाचा समावेश करण्याची मागणी केली आहे.

गृहिणी पायियो आशिहो आणि वकील विवेक दिवान यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कर लाभांसाठी 'जोडीदार' (पती किंवा पत्नी) या शब्दाचा समावेश करण्याची मागणी केली आहे. सध्याच्या तरतुदीमुळे समलिंगी जोडप्यांना आर्थिकदृष्ट्या असमान वागणूक मिळते, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांतर्फे प्राथमिक सुनावणीदरम्यान करण्यात आला. न्यायमूर्ती बर्गेस कोलाबावाला आणि न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली.

यावेळी केंद्र सरकार आणि आयकर विभागातर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी बाजू मांडली.

Bihar Politics : यादव कुटुंब कलह तीव्र; रोहिणी आचार्य यांचे गंभीर आरोप, म्हणाल्या, "घाणेरड्या शिव्या दिल्या, चप्पल उगारली...

न्यायालयाच्या वेळेचे मूल्य एक लाख! वेळ वाया घालविल्याबद्दल शेतकरी कुटुंबियाला दणका

Solapur : धक्कादायक! "कोणी माझी आठवण नाही काढली पाहिजे"; स्टोरी ठेवत तरुणाची आत्महत्या

विद्यार्थ्यांसाठी मोठी भेट! शालेय सहलींसाठी राज्य परिवहनच्या नवीन बसेस; भाड्यात तब्बल ५०% सवलत

ठाण्यात पाळीव प्राण्यांसाठी पहिली गॅस शवदाहिनी