मुंबई

समृद्धी महामार्गाचा टोल १२०० रुपये?

प्रतिनिधी

गेल्या काही वर्षांमध्ये राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आलेल्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लवकरच उद्घाटन केले जाणार आहे. त्याच्या उद्‌घाटनानंतर मुंबई ते नागपूर हे ७०१ किलोमीटरचे अंतर वेगाने पार करता येणार आहे. ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ असे या द्रुतगती मार्गाचे नामकरण करण्यात आले आहे. आता पहिल्यांदाच या महामार्गावर भराव्या लागणाऱ्या टोलचे अधिकृत दर समोर आले आहेत. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनापूर्वी या महामार्गाच्या टोलची माहिती देणारा फलक महामार्गाच्या कडेला लावण्यात आला असून, त्याचा फोटो सध्या व्हायरल होऊ लागला आहे. या फोटोमध्ये सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नेमका किती टोल भरावा लागणार, यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. टोलचे हे दर ३१ मार्च २०२५ पर्यंत अर्थात पुढील जवळपास तीन वर्षांसाठी लागू असतील, असेही या फलकावर नमूद करण्यात आले आहे. साध्या चारचाकी वाहनांसाठी अर्थात कार्ससाठीचा टोल या फलकावर नमूद करण्यात आला आहे. त्यानुसार, या महामार्गावर प्रवास करणाऱ्या चारचाकी गाड्यांसाठी प्रतिकिलोमीटर १.७३ रुपये टोलची वसुली करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईपासून थेट नागपूरपर्यंत ७०१ किलोमीटरचा पूर्ण प्रवास करणाऱ्या चारचाकी गाड्यांना जवळपास १२०० रुपये टोल भरावा लागणार आहे.

असा असेल टोलदर

 मोटार, जिप, व्हॅन अथवा हलकी मोटार वाहने : १.७३ रुपये प्रति किमी

 हलकी व्यावसायिक वाहने, हलकी मालवाहतुकीची वाहने अथवा मिनी बस : २.७९ रुपये प्रतिकिमी

 बस अथवा ट्रक : ५.८५ रुपये प्रतिकिमी

 तीन आसांची व्यावसायिक वाहने : ६.३८ रुपये प्रतिकिमी

 अवजड बांधकाम यंत्रसामग्री, अनेक आसांची वाहने : ९.१८ रुपये प्रतिकिमी

 अतिअवजड वाहने (सात किंवा जास्त आसांची) : ११.१७ रुपये प्रतिकिमी

"तो मुलाच्या बर्थडे पार्टीचा प्लॅन करत होता, आता आम्ही त्याच्या अंत्यसंस्काराची योजना आखतोय": पूंछ हल्ल्यातील शहीद जवानाचे नातलग

'ही' परवडणारी कार देते 25 Kmplचं भन्नाट मायलेज! ग्राहकांना लावलंय वेड

जीवघेणा रेल्वे प्रवास; सर्वाधिक महसूल गोळा करणाऱ्या रेल्वेला प्रवाशांच्या जीवाचे मोल शून्य

आई-बापानेच मुलगी, नातवाच्या मदतीने केली स्वतःच्या मुलाची हत्या

तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला,मंगळवारी दिग्गजांचे भवितव्य ठरणार!