मुंबई

संजय दिना पाटील यांना दुसऱ्यांदा खासदारकी, अरविंद सावंत यांची हॅटट्रिक; पियूष गोयल अपेक्षेप्रमाणे विजयी

भाजपसाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मुंबई उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे संजय दीना विजयी झाले तर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अरविंद सावंत सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत.

Swapnil S

संजय दिना पाटील यांना दुसऱ्यांदा खासदारकी

ईशान्य मुंबई: भाजपसाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मुंबई उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे संजय दीना पाटील यांनी भाजपचे मिहीर कोटेचा यांचा २९ हजार ८६१ मतांनी पराभव केला. संजय दीना पाटील यांना ४ लाख ५० हजार ९३७ मते मिळाली. तर मुलुंडचे विद्यमान आमदार मिहीर कोटेचा यांना ४ लाख २१ हजार ७६ मते मिळाली. दरम्यान, मतांचे ध्रुवीकरण हा महत्त्वाचा मुद्दा मिहीर कोटेचा यांच्या पराभवास कारणीभूत ठरला. भाजपने यावेळी मावळते खासदार मनोज कोटक यांना उमेदवारी नाकारत कोटेचा यांना संधी दिली होती. कोटेचा यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घाटकोपरमध्ये रोड शो केला होता. पण त्याचाही परिणाम दिसला नाही.

अरविंद सावंत यांची हॅटट्रिक

दक्षिण मुंबई : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अरविंद सावंत सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. अरविंद सावंत यांनी येथून आपल्या निकटच्या प्रतिनिधी आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव यांचा पराभव केला आहे. अरविंद सावंत यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव यांचा तब्बल ५२ हजार ६७३ मतांनी पराभव केला. अरविंद सावंत यांना ३ लाख ९५ हजर ६५५ मते मिळाली तर यामिनी जाधव याना ३ लाख ४२ हजार ९८२ मते मिळाली. मतमोजणीत सुरुवातीला यामिनी जाधव मोठ्या फरकाने आघाडीवर होत्या. मात्र काही फेऱ्यांनंतर अरविंद सावंत यांनी आघाडी घेतली आणि ती अखेरपर्यंत टिकवली.

पियूष गोयल अपेक्षेप्रमाणे विजयी

उत्तर मुंबई: भाजपच्या पारड्यात पडलेली मुंबई शहर व उपनगरातील ही एकमेव जागा आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उमेदवार पियूष गोयल अपेक्षेप्रमाणे विजयी झाले आहेत. उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपचे पियूष गोयल यांनी काँग्रेसचे भूषण पाटील यांचा ३ लाख ५७ ६०८ मतांनी पराभव केला. पियूष गोयल यांना ६ लाख ८० हजार १४६ मते मिळाली तर भूषण पाटील यांना ३ लाख २२ हजार ५३८ मते मिळाली. भाजपने या मतदारसंघात विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना वगळून पियूष गोयल यांना उमेदवारी दिली होती. या मतदारसंघात गुजराती मतदारांचे प्राबल्य अधिक असल्यामुळे हा विजय भाजपसाठी सोपा होता. मात्र तरीही कुठल्याही प्रकाशझोतात नसलेल्या काँग्रेसच्या भूषण पाटील यांनी जवळपास सव्वा तीन लाख मते घेत त्यांनी कडवी टक्कर दिली.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन