Mumbai : बीकेसी-वाकोला जोडमार्गाचे काम पूर्णत्वाला; सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडची मार्गिका होणार पूर्ण 
मुंबई

Mumbai : बीकेसी-वाकोला जोडमार्गाचे काम पूर्णत्वाला; सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडची मार्गिका होणार पूर्ण

मुंबईतील सर्वात महत्त्वाच्या पूर्व-पश्चिम दळणवळण मार्गांपैकी एक असलेल्या सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड (एससीएलआर) टप्पा-२ प्रकल्पाच्या पूर्णत्वाच्या दिशेने एमएमआरडीएने महत्त्वपूर्ण टप्पा गाठत अंतिम संरचनात्मक काम यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील सर्वात महत्त्वाच्या पूर्व-पश्चिम दळणवळण मार्गांपैकी एक असलेल्या सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड (एससीएलआर) टप्पा-२ प्रकल्पाच्या पूर्णत्वाच्या दिशेने एमएमआरडीएने महत्त्वपूर्ण टप्पा गाठत अंतिम संरचनात्मक काम यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. यामुळे संपूर्ण १०.८८ किमी लांबीचा एससीएलआर मार्गिका नेटवर्क पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. यामुळे बीकेसी ते वाकोला जोडमार्गाचे काम लवकरच पूर्ण होणार आहे.

वाकोला नाल्यावर असलेल्या पुलावर पहिल्या आणि दुसऱ्या स्तरावर ५४ मीटर लांबीचे दुहेरी कॉम्पोझिट गर्डर्स यशस्वीरीत्या उभारल्यानंतर भारत डायमंड बोर्स (बीकेसी) ते वाकोला दरम्यानचा शेवटचा महत्त्वाचा संरचनात्मकदृष्ट्या पूर्ण झाला आहे. हा भाग तुलनेने लहान असला तरी विविध उड्डाणपूल, जोडमार्ग आणि संरचनांना एकत्रित जोडण्यात त्याची निर्णायक भूमिका आहे, दुवा संपूर्ण ज्यामुळे एससीएलआर नेटवर्क कार्यान्वित होण्यास मदत होते.

  • हे गर्डर्स पूर्ण - स्पॅन लॉन्चिंग पद्धतीद्वारे उभारण्यात आले असून यासाठी ७०० मेट्रिक टन आणि ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या हेवी-ड्युटी क्रेन्सचा वापर करण्यात आला.

  • विविध टप्प्यांत विकसित झालेल्या स्वतंत्र भागांना आता एकत्रित करून सुमारे ११ किमी लांबीचा अखंड, सिग्नल-फ्री पूर्व-पश्चिम मार्ग तयार होत आहे तो पूर्व द्रुतगती महामार्ग (ईईएच), पश्चिम द्रुतगती महामार्ग (डब्ल्यूईएच), बांद्रा-कुर्ला संकुल (बीकेसी) आणि सांताक्रूझ, वाकोला, कलिना, कुर्ला आणि चेंबूर या अंतिम जोडमार्गामुळे एससीएलआर मार्ग आता अखंड गतिमान वाहतुकीचा कणा बनणार आहे.

  • या अंतिम टप्प्याच्या पूर्णत्वामुळे स्वतंत्र भागांमधील जोडणीपासून एकात्मिक शहरी दळणवळण प्रणालीकडे संक्रमण घडत आहे. मुंबईचा विस्तार वेगाने होत असताना अशा नेटवर्क-आधारित पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे प्रवासाचा वेळ कमी होईल, वाहतूककोंडी कमी होईल आणि अधिक सुसंगत व अखंडपणे जोडलेले शहर उभारण्याच्या दृष्टिकोनाला गती मिळेल.

स्पॅनची प्रमुख वैशिष्ट्ये

  • लांबी : ५४.० मीटर

  • डेक रुंदी : ८.५ मीटर

  • अंदाजे वजन : ३५८ मेट्रिक टन

  • गर्डर मांडणी : तीन समांतर गर्डर्स

  • गर्डर खोली : प्रत्येकी ३.१३० मीटर

या अंतिम जोडमार्गाच्या पूर्णत्वामुळे सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड सुमारे ११ किमी लांबीचा एकात्मिक पूर्व-पश्चिम दळणवळण मार्ग बनत आहे. मुंबईतील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी आणि जलद जोडणी सुनिश्चित करण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. अशा प्रकल्पांमुळे शहरात कार्यक्षम, विश्वासार्ह आणि भविष्योन्मुख दळणवळण व्यवस्था निर्माण होत आहे.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

Mumbai : आता उद्यानांमध्ये मातांसाठी स्तनपान कक्ष; आराखडा तयार, विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत समावेश करणार

मुंबईतील तीन महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के; सात महाविद्यालयांमधील काही शाखांचा निकाल शून्य टक्के

मुंबई विभागाचा निकाल घसरला; यंदाचा सर्व शाखांचा निकाल ९०.०८ टक्के, गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात २.८५ टक्के घट

'लालपरी'चा प्रवास महागणार; सरसकट दोन रुपये स्वच्छता अधिभार, शौचालये मोफत

Mumbai : भाजपच्या नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस; सभागृहात महत्त्वाच्या प्रस्तावावेळी होते गैरहजर