मुंबई

पावसाळ्यापूर्वी उघडी मॅनहोल बंदिस्त करा! वॉर्ड स्तरावर संरक्षक जाळ्या बसवण्याचे आदेश

पर्जन्य जलवाहिनी विभाग व मलनि:सारण विभाग या दोन्ही विभागाच्या मिळून मुंबईत एक लाखांहून अधिक मॅनहोल आहेत. ऑगस्ट २०१७ मध्ये परळ येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून बॉम्बे रुग्णालयाचे डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती.

Swapnil S

मुंबई : पुढील दोन महिन्यांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. पावसाळ्यात मुंबईकरांना उघड्या मॅनहोलचा धोका निर्माण होऊ नये, यासाठी उघडी मॅनहोल संरक्षक जाळ्यांनी बंदिस्त करण्याचे आदेश पालिकेच्या २५ वॉर्डातील संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अभिजीत बांगर यांनी सांगितले.

पर्जन्य जलवाहिनी विभाग व मलनि:सारण विभाग या दोन्ही विभागाच्या मिळून मुंबईत एक लाखांहून अधिक मॅनहोल आहेत. ऑगस्ट २०१७ मध्ये परळ येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून बॉम्बे रुग्णालयाचे डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. त्यानंतर उघड्या मॅनहोलचा प्रश्न ऐरणीवर आला आणि मुंबई महापालिकेवर टीकेची झोड उठली. उघड्या मॅनहोलच्या प्रश्नावरून उच्च न्यायालयानेही पालिकेची कानउघाडणी केली. उघडी मॅनहोल संरक्षक जाळ्यांनी बंदिस्त करण्याचे आदेश देत तज्ज्ञ वकील व पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने पालिकेला दिले होते.

न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईत मलनि:सारण व पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या एकूण १ लाखांहून अधिक मॅनहोल आहेत. उघड्या मॅनहोलवर संरक्षक जाळ्या बसवण्याचे काम प्रगतिपथावर असून वॉर्ड स्तरावर निविदा प्रक्रिया राबवण्यात येत असल्याची माहिती पालिका प्रशासनाने उच्च न्यायालयात दिली. न्यायालयात माहिती देऊन सहा महिने उलटले तरी अद्याप निविदा प्रक्रियाच राबवण्यात येत असल्याने यंदाच्या पावसाळ्यात उघड्या मॅनहोलचा धोका कायम आहे.

दरम्यान, पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनीही उघड्या मॅनहोलचा प्रश्न गांभीर्याने घेतला आहे. आयुक्तांचेही या गंभीर मुद्द्यावर लक्ष असून त्यांनीही मॅनहोल संरक्षक जाळ्यांनी बंदिस्त करण्याचे आदेश दिले आहेत.

एकूण मॅनहोल : १ लाख २८६

  • मलनिःसारण विभाग : ७४ हजार ६९

  • पर्जन्य जलवाहिन्या विभाग : २५ हजार ५९३

  • संरक्षक जाळ्या बसवल्या मलनिःसारण विभाग : १ हजार ९८२

  • पर्जन्य जलवाहिन्या विभाग : ३ हजार ६९२

  • एकूण : ५ हजार ६७४

Pune : प्रियकरासोबत मिळून होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढला? दरीत ढकलून अपघाताचा बनाव; तपासात समोर आले धक्कादायक खुलासे

केंद्राच्या तात्पुरत्या बंदीनंतर प्ले स्टोअरवर Telegram पुन्हा सुरू; पण ॲप स्टोअरवरून अजूनही गायब

Delhi Crime : फुटपाथवर झोपलेल्या ११ वर्षीय मुलीचे अपहरण; लैंगिक अत्याचारानंतर हत्या, कॅब चालक जेरबंद!

Mumbai : ‘ओसी’ नसलेल्या इमारतींना दिलासा; ८०० चौरस फुटांपर्यंत सदनिका असलेल्या इमारतींना मिळणार OC, राज्य सरकारची मंजुरी

Lucknow Fire : लग्नाचं स्वप्न झालं भस्मसात! जिथे प्रेम फुललं, तिथेच जोडप्याचा अंत, लखनऊ अग्निकांडमधील मन सुन्न करणारी घटना