मुंबई

मुंबईतील सर्व कार प्रवाशांना सीट बेल्ट बंधनकारक; चालक आणि सह प्रवाशांसाठी सीट बेल्ट

ज्या वाहनांकडे सीट बेल्टची सुविधा नाही, त्यांनी सर्व प्रवाशांसाठी सीट बेल्ट लावणे आवश्यक असल्याचे मुंबई पोलिसांनी यापूर्वी सांगितले होते. यासाठी १ नोव्हेंबर ही अंतिम तारीखही निश्चित करण्यात आली होती.

प्रतिनिधी

कारमधून प्रवास करणार्‍या सर्व प्रवाशांना १ नोव्हेंबर २०२२पासून सीट बेल्ट घालणे अनिवार्य केले आहे. १४ ऑक्टोबर २०२२ रोजी मुंबई पोलिसांनी एक अधिसूचना जारी केली होती की १ नोव्हेंबरपासून चालक आणि सहप्रवाशांना सीट बेल्ट घालणे अनिवार्य असेल. त्या अधिसूचनेत, मुंबई पोलिसांनी म्हटले होते की जो कोणी सुरक्षा बेल्ट न लावता मोटार वाहन चालवतो किंवा सीट बेल्ट न लावलेल्या प्रवाशांना घेऊन जातो त्या चालकाला दंड आकारण्यात येईल.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई वाहतूक पोलीस सीट बेल्ट जनजागृती मोहीम सुरू करणार आहे जी १० दिवस चालेल, त्यानंतर कारवाई केली जाईल.ते असं देखील म्हणाले कि, “११ नोव्हेंबरपासून जे प्रवासी कारमध्ये सीट बेल्टशिवाय बसलेले आढळतील अगदी मागील सीटवरही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल".

ज्या मोटार वाहनांकडे सीट बेल्टची सुविधा नाही त्यांनी सर्व प्रवाशांसाठी सीट बेल्ट लावणे आवश्यक असल्याचे मुंबई पोलिसांनी यापूर्वी सांगितले होते. यासाठी १ नोव्हेंबर २०२२ ही अंतिम तारीखही निश्चित करण्यात आली होती.

मुंबईच्या आधी, सप्टेंबरमध्ये, रस्ता सुरक्षा नियम तीव्र करण्याच्या प्रयत्नात, दिल्ली वाहतूक पोलिसांनी लोकांना मागील सीट बेल्ट वापरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी एक विशेष मोहीम देखील सुरू केली होती, ज्यामध्ये अयशस्वी झाल्यास त्यांना ₹१,००० च्या दंडाला सामोरे जावे लागेल.

"सर्व मोटार वाहन चालक आणि वाहनातील सर्व प्रवासी, मुंबई शहराच्या रस्त्यावरून प्रवास करणार्‍या सर्व प्रवाशांना याद्वारे कळविण्यात येते की, ०१/११/२०२२ पासून प्रवास करताना चालक आणि सर्व प्रवाशांनी सीट बेल्ट लावणे बंधनकारक असेल. अन्यथा मोटार वाहन (सुधारणा) कायदा २०१९च्या कलम १९४(B)(1) अंतर्गत कारवाई केली जाईल."

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली