मुंबई

विक्रोळीत तरुणीला पाहून अश्लील चाळे, संरक्षणासाठी धावला सुरक्षारक्षक; सहाय्यक पोलीस आयुक्तांकडून कौतुक

आजही शहरात महिला, मुली असुरक्षित आहेत. याचे जिवंत उदाहरण म्हणजे विक्रोळी येथे घडलेली एक दुर्देवी घटना होय.

Swapnil S

मुंबई : आजही शहरात महिला, मुली असुरक्षित आहेत. याचे जिवंत उदाहरण म्हणजे विक्रोळी येथे घडलेली एक दुर्देवी घटना होय. रस्त्यावरून जाणाऱ्या एका मुलीला एका पुरुषाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला असता त्या नराधमाला एका सुरक्षारक्षकाने आपल्या कर्तव्याचा हिसका दाखवत त्या मुलीला सुरक्षित केले. या घटनेमुळे महाराष्ट्र शासन स्थापित सुरक्षारक्षक मंडळातील सुरक्षारक्षक समीर कोळवणकर यांचे सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर उतळे यांनी प्रशंसापत्र देऊन अभिनंदन केले.

सुरक्षारक्षक समीर कोळवणकर कामावरून घरी बसने निघाले होते. कन्नमवार नगर विक्रोळी स्टेशनवरून जाणारी बेस्ट बस कन्नमवार नगरच्या दिशेने जात असताना टागोर नगरला जाणाऱ्या रस्त्यावरील बस स्टॉप जवळ एक विकृत पुरुष रस्त्यावरून चालणाऱ्या एका २५ वर्षीय मुलीला पाहून लैंगिक चाळे करून हावभाव करत असताना ती मुलगी घाबरून पळू लागली. तो तिला पकडायला धावला त्यावेळेस सुरक्षारक्षक समीर कोळवणकर यांनी प्रसंगावधान दाखवत त्या मुलीचे संरक्षण केले. पुढील गंभीर घटना कोळवणकर यांच्यामुळे टळली. ही घटना त्यांनी सोशल मीडियावर टाकली होती. तसेच विक्रोळी पोलीस ठाण्यामध्ये आणि डीसीपी ऑफिसला जाऊन लेखी सूचना केली होती. या प्रकरणाची दखल सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर उतळे यांनी घेत सुरक्षारक्षक कोळवणकर यांचे प्रशंसापत्र देऊन अभिनंदन केले.

दुष्काळाचा ३ टप्प्यांत आढावा; राज्य सरकारकडून मदत; उपाययोजनांना सुरुवात, ५ ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार

हेक्टरी १ लाख मदत, पूर्ण कर्जमाफी द्या : हर्षवर्धन सपकाळ

प्राध्यापकावर कारवाई; IIT मुंबईतील विद्यार्थी आत्महत्येप्रकरणी संस्थेने मागितली माफी; गेल्या २० वर्षांत १६० विद्यार्थ्यांची आत्महत्या

ठाण्याला पावसाने झोडपले; राज्यातील अनेक भागांना यलो अलर्ट

Mumbai : एक हजार झोपडीधारकांना नोटिसा; १४ फुटांवरील झोपड्यांवर कारवाई अटळ, आकडा वाढणार