मुंबई

शेअर बाजारात सेन्सेक्स ४५६ अंकांनी वधारला

वृत्तसंस्था

मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्स ४५५.९५ अंक किंवा ०.७६ टक्का वधारुन ६०,५७१.०८वर बंद झाला. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी १३३.७० अंक किंवा ०.७५ टक्का वाढून १८,०७०.०५वर बंद झाला. सेन्सेक्सवर्गवारीत बजाज फिनसर्व, इंडस‌्इंड बँक, भारती एअरटेल, टायटन आणि बजाज फायनान्सच्या समभागात वाढ झाली.

एचडीएफसी लाईफ इन्शुरन्सचा समभाग १ टक्क्याने वधारला

एचडीएफसी लाईफ इन्शुरन्सचा समभाग मंगळवारी १ टक्के वधारला. ब्रिटनस्थित गुंतवणूक कंपनी अबर्डनने म्हटले की, ते खासगी क्षेत्रातील एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स कंपनीतील ४.३ कोटी शेअर्स ब्लॉक डील अंतर्गत विकण्याची योजना आखली आहे.

एचडीएफसी लाईफ इन्शुरन्समधील दोन टक्के हिस्सा विक्री करुन २,४२५ कोटी रुपये ही कंपनी उभारणार आहे. हे वृत्त जाहीर झाल्यानंतर एचडीएफसी लाईफ इन्शुरन्सचा समभाग १ टक्का वधारला. एचडीएफसी लाईफचा समभाग मंगळवारी सकाळी ६०१ रुपयांना उघडला आणि दिवसअखेरीस १.२१ टक्के वधारुन ५८६.९० रुपयांवर बंद झाला.

"अमेठी आणि रायबरेली दोन्ही माझं कुटूंब..." उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राहुल गांधींची भावनिक पोस्ट

संजय निरूपम यांचा शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हाती घेतला भगवा

"जाहीर माफी मागा, अन्यथा..."; पॉर्न स्टार म्हटल्यामुळे दुखावलेल्या 'त्या' अभिनेत्याचा चित्रा वाघ यांना इशारा

सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर झाले क्रॅश, Video सोशल मीडियावर व्हायरल

धक्कादायक! पत्नीनं दिलं गुंगीचं औषध, पतीनं केला बलात्कार...; मुंबईत नेमकं काय घडलं?