मुंबई

भावाच्या कर्जासाठी बहिणीला अश्‍लील फोटो पाठविले ; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

याप्रकरणी या व्यक्तीविरुद्ध वांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे.

प्रतिनिधी

मुंबई : भावाने घेतलेल्या कर्जाची परतफेड केली नाही म्हणून अज्ञात व्यक्तीने त्याच्या बहिणीला शिवीगाळ करून अश्‍लील फोटो पाठविल्याची घटना वांद्रे परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी या व्यक्तीविरुद्ध वांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे.

वांद्रे येथे राहणारी ३० वर्षांची तक्रारदार महिला बेबी केअरचे काम करत असून शनिवारी तिला एका अज्ञात व्यक्तीने मॅसेज करून कर्जाची परतफेड कधी करणार, अशी विचारणा केली. तिने कुठलेही कर्ज घेतले नाही, असे सांगितल्यानंतर त्याने तिला एक फोटो पाठविला होता. तो फोटो तिच्या भावाचा होता. तिच्या भावाने एका खासगी कंपनीतून कर्ज घेतले होते. त्याने कर्ज भरले नाही, त्याचे कर्ज तू भरणार आहे, असे त्याने सांगितले आहे. त्यामुळे त्याच्या कर्जाचे हप्ते तातडीने भरण्याची त्याने धमकी दिली होती. यावेळी तिने या कर्जाशी तिचा काहीही संबंध नसल्याचे सांगून कर्ज भरण्यास नकार दिला होता. यावेळी त्याने तिला शिवीगाळ करून अश्लील फोटो पाठवून तिचे मानसिक शोषण करण्याचा प्रयत्न केला होता.

हा प्रकार तिने तिच्या पतीला सांगितला. त्यानंतर त्यांनी वांद्रे पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी भादवीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून या आरोपीचा शोध सुरू केला आहे. त्याच्या मोबाईलची माहिती काढण्याचे काम सुरू असून त्यावरून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत