मुंबई

नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला तीन वर्षांनंतर सशर्त जामीन मंजूर

नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत अटकेत असलेल्या आरेापी प्रदीपकुमार राजेंद्रप्रसाद मिश्रा याला सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने तीन वर्षांनंतर दिलासा दिला.

Swapnil S

मुंबई : नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत अटकेत असलेल्या आरेापी प्रदीपकुमार राजेंद्रप्रसाद मिश्रा याला सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने तीन वर्षांनंतर दिलासा दिला. सत्र न्यायालयाच्या विशेष पोक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश माधुरी देशपांडे यांनी खटल्याला होणारा विलंब आणि आरोपीच्या मुलाला झालेल्या ब्रेनट्युमर कॅन्सरचे ऑपरेशनच्या मुद्द्यावर सशर्त जामीन मंजूर केला.

अँटॉप हिल परीसरात रहाणार्‍या पीडित मुलीने नोकरीच्या शोधात एक ॲप डाऊनलोड करून नोंदणी केली. त्यानंतर त्यावर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल केला. आरोपी प्रदीपकुमार राजेंद्रप्रसाद मिश्रा यांने पीडित मुलीला तीन वर्षांपूर्वी २० एप्रिल २०२१ ला फोन करून मुलाखतीसाठी कांदिवली स्टेशनवर बोलविले. आरोपीने पीडित मुलीला हॉटेलमध्ये नेऊन मुलाखतीच्या नावाखाली कपडे काढण्यास भाग पाडले. त्यानंतर तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर आठ दिवसांनी पुन्हा बळजबरीने अत्याचार केला. त्यातून ती गर्भवती राहिली.

आठ महिन्यांनी ही बाब तिच्या आजीच्या लक्षात आल्यानंतर आरोपीविरोधात तातडीने गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात भादंवि कलम ३७६ आणि ३७६(२) तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.

अटकेत असलेल्या आरोप प्रदीपकुमार राजेंद्रप्रसाद मिश्रा याच्या वतीने ॲॅड एम. बी. शेख यांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. या अर्जावर न्यायाधीश माधुरी देशपांडे यांच्या समोर सुनावणी झाली. यावेळी आरोपीच्या वतीने ॲॅड. एम. बी. शेख यांनी यांनी पीडित मुलीच्या तक्रारीलाच जोरदार आक्षेप घेतला. या गुन्ह्यात नाहक अडकविण्यात आल्याचा दावा केला. तसेच तपास पूर्ण झाला असून आरोपीविरोधात आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. याकडे न्यायालयाचे लक्ष वेधताना आरोपीच्या मुलाला ब्रेनट्युमर असून त्याच्या ऑपरेशनसाठी तसेच मुलाची काळजी घेण्यासाठी जामीन मंजूर करावा, अशी विनंती केली.

याची न्यायालयाने गंभीर दखल घेतली. पिडीत मुलीने न्यायालयात आरोपीला ओळखलेजले नाही तसेच फिर्यादीच्या खटल्याला पाठिंबा दिलेला दिसून येत नाही. चटल्यातील तपासण्यात आलेल्या साक्षीदारांचा विचार करता. तसेच आजारी मुलाचा विचार करता आरोपीला सर्शत जामीन मंजूर केला.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी