बाबा सिद्दीकी  संग्रहित छायाचित्र
मुंबई

सिद्दीकी हत्या प्रकरण खटल्यात पत्नी सहभागी होणार

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात त्यांच्या पत्नी शहझीन सिद्दीकी यांना खटल्यात सहभागी होण्यास शनिवारी विशेष न्यायालयाने परवानगी दिली.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात त्यांच्या पत्नी शहझीन सिद्दीकी यांना खटल्यात सहभागी होण्यास शनिवारी विशेष न्यायालयाने परवानगी दिली.

१२ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री, मुंबईतील बांद्रा (पूर्व) येथील त्यांच्या मुलगा झीशान सिद्दीकीच्या कार्यालयाबाहेर ६६ वर्षीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर तिघा हल्लेखोरांनी गोळीबार केला होता, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

शहझीन सिद्दीकी यांनी गेल्या महिन्यात हस्तक्षेप अर्ज दाखल केला होता. त्यांनी आपल्या अर्जात, “हे नुकसान भरून न निघणारे” असल्याचे नमूद केले आणि खटल्यात “खरे आणि अचूक तथ्य” मांडण्याची गरज अधोरेखित केली.

विशेष मोक्का न्यायाधीश बी. डी. शेलके यांनी त्यांचा अर्ज मंजूर केला. या निर्णयानंतर शहझीन सिद्दीकी आता अधिकृतपणे खटल्यात पक्षकार झाल्या असून, त्या सरकारी पक्षाला मदत करतील. ही न्यायालयीन प्रक्रियेत एक महत्त्वपूर्ण घटना असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले.

पोलीसांनी या प्रकरणात २६ अटक केलेल्या आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे, तर अटक झालेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई आणि आणखी दोघे अजूनही फरार आहेत.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस