मुंबई

शिंदे गटाला केंद्रात ३ मंत्रिपदे मिळणार;अमित शहांसोबत झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब

प्रतिनिधी

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर त्यांना शिवसेनेच्या १२ खासदारांचाही पाठिंबा मिळाला; मात्र शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला असतानाच आता शिंदे गटाला केंद्रातसुद्धा ३ मंत्रिपदे मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे.

शिंदे गटाकडून या तीन मंत्रिपदांसाठी खासदार राहुल शेवाळे, खासदार प्रताप जाधव आणि खासदार श्रीरंग बारणे यांची नावे चर्चेत आहेत. आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका आणि शिंदे गटाचे राज्यातील समीकरण या सर्व गोष्टी विचारात घेवून या तिघांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.

शिंदे गटाला शिवसेनेच्या १८ पैकी १२ खासदारांचे समर्थन मिळाले आहे. जुलै महिन्यात राष्ट्रपती निवडणुकीदरम्यान या १२ खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र देत राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी तर भावना गवळी यांची प्रतोदपदी निवड केली आहे.

शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार, संजय निरुपम यांचा दावा

गँगरेपनंतर तलवारीनं कापली बोटे...बांसवाडा घटनेची हादरवून टाकणारी कहाणी, आरोपींनी गाठला क्रूरतेचा कळस

"नाहीतर देशातील हुकुमशाही सुरुच राहील..."खासदार अरविंद सावंतांची पंतप्रधान मोदींवर टीका

लष्करातील जवानाने EVM मध्ये फेरफार करण्यासाठी अंबादास दानवेंकडे मागितले २.५ कोटी!

Auto Sweep Service: बँकेत जाऊन फक्त 'हे' सांगा, बचत खात्यावर मिळेल तिप्पट व्याज