मुंबई

BMC Elections : शिंदे सेनेचा सावध पवित्रा; नगरसेवकांचा मुक्काम हॉटेलमध्ये; अडीच वर्षे महापौरपदासाठी शिंदेचे दबावतंत्र

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला स्वबळावर सत्ता स्थापण्याइतके बहुमत मिळू न शकल्याने त्यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मदत घ्यावी लागणार आहे. शिंदे सेनेला मुंबईत २९ जागांवर विजय मिळवण्यात यश मिळाले आहे. यामुळे मुंबई महापालिकेत अडीच वर्षांसाठी महापौरपद मिळावे यासाठी शिंदे सेना प्रयत्नशील आहे.

गिरीश चित्रे

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला स्वबळावर सत्ता स्थापण्याइतके बहुमत मिळू न शकल्याने त्यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मदत घ्यावी लागणार आहे. शिंदे सेनेला मुंबईत २९ जागांवर विजय मिळवण्यात यश मिळाले आहे. यामुळे मुंबई महापालिकेत अडीच वर्षांसाठी महापौरपद मिळावे यासाठी शिंदे सेना प्रयत्नशील आहे. यासाठी शिंदे सेनेकडून दबावतंत्राचा वापर केला जात असल्याची चर्चा आहे. त्याचवेळी निवडून आलेले नगरसेवक कुठल्याही आमिषाला बळी पडू नयेत किंवा कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी सावधगिरी बाळगत शिंदे यांनी या २९ नगरसेवकांना वांद्रे येथील हॉटेल ताज लैंडस् एंडमध्ये ठेवले आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ८९ जागांवर विजय मिळवला आहे. मात्र, शिंदेंच्या २९ विजयी नगरसेवकांशिवाय ते आपला महापौर बनवू शकत नाहीत. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या युतीने ७२ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे ते सत्तेपासून दूर आहेत. असे असले तरी एकनाथ शिंदेंच्या काही नगरसेवकांनी शिवसेना फुटीआधी उद्धव ठाकरेंसोबत काम केले आहे. त्यामुळे ऐनवेळी उद्धव ठाकरे दगाफटका करून आपले नगरसेवक फोडून सत्तास्थापनेचा दावा करू शकतात, याची भीती एकनाथ शिंदेंना असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे आपल्या भाजपपासूनदेखील नगरसेवकांना लांब ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी ही रणनिती आखल्याचे समजते.

महापौर भाजपचा होत असला तरी आपल्या नगरसेवकांशिवाय ते शक्य नाही, हे एकनाथ शिंदेंनी नाहा, हेरले आहे. त्यामुळे मुंबईत भाजपचा महापौर होत असला तरी सत्तेत आपल्याला मोठा वाटा मिळावा, यासाठी एकनाथ शिंदे दबावतंत्राचा वापर करीत असल्याचे बोलले जात आहे. भाजपसोबत बोलणी करताना जर जास्त ताणले, तर तेही आपले नगरसेवक फोडू शकतात, अशीही भीती एकनाथ शिंदेंना आहेच. त्यामुळे जोपर्यंत महापौर निवड होत नाही तोपर्यंत विजयी नगरसेवकांना 'ताज लँड्स एंड' मध्ये थांबण्याच्या सूचना देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे यांची प्रकृती बिघडली; डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला

गेला महिनाभर मनपा निवडणुकीत जोरदार प्रचार करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे शिंदे यांनी त्यांचे सर्व कार्यक्रम स्थगित केले आहेत. शिंदे हे शनिवारी कॅबिनेटच्या बैठकीलाही उपस्थित नव्हते. तशी त्यांनी मुख्यमंत्र्यांना आधीच कल्पना दिली होती, असे सांगण्यात आले. मनपा निवडणुकीत महिनाभरात शिंदे यांनी मुंबईसह राज्यभर सभांचा धडाका लावला होता. राज्यातील सर्व प्रमुख महापालिकांमध्ये त्यांनी सभा घेतल्या. या धावपळीमुळे शिंदेंची प्रकृती बिघडल्याची माहिती आहे.

उल्हासनगर महापालिकेत सत्तासंघर्षाला वेग; शिवसेना शिंदे गटामार्फत सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू

काँग्रेसमध्ये नाराजी! वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबईतील वायू प्रदूषण पुन्हा वाढले; थंडीच्या मोसमात शहर धुक्याने वेढले

मेन्टेनन्स योग्यच! प्रलंबित देखभाल शुल्क वसूल करण्याच्या सोसायटी निर्णयाला मान्यता

मध्य रेल्वेवर आज मेगाब्लॉक; CSMT - विद्याविहार स्थानकांदरम्यान अप व डाउन मार्गावर दुरुस्ती