संग्रहित छायाचित्र  
मुंबई

पालिकेसाठी शिंदेसेना सज्ज; शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती जाहीर, २१ प्रमुख नेत्यांची नावे घोषित

आगामी निवडणुकीत मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने रणनिती आखली आहे. मुंबईकरांच्या समस्या सोडवणे, शिवसेना पक्षाचे कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे यासाठी शिंदे सेनेची टीम सज्ज झाली असून २१ प्रमुख नेत्यांची टीम जाहीर करण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : आगामी निवडणुकीत मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने रणनिती आखली आहे. मुंबईकरांच्या समस्या सोडवणे, शिवसेना पक्षाचे कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे यासाठी शिंदे सेनेची टीम सज्ज झाली असून २१ प्रमुख नेत्यांची टीम जाहीर करण्यात आली आहे.

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने पक्षाची मुख्य कार्यकारी समिती तयार करण्यात आलेली आहे. यात पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यासह २१ शिलेदारांचा समावेश करण्यात आला आहे. शिवसेनेची ही मुख्य कार्यकारी समिती पुढीलप्रमाणे असेल. आगामी महापालिका निवडणुकीतील पक्षाच्या पातळीवरील महत्त्वाचे निर्णय या समितीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहेत. शिवसेनेचे प्रमुख नेते, खासदार, माजी खासदार, आमदार, माजी आमदार यांना यात संधी देण्यात आली आहे.\

एकनाथ शिंदे, मुख्य नेते

  • रामदास कदम, नेते

  • गजानन कीर्तीकर, नेते

  • आनंदराव अडसूळ, नेते

  • मीना कांबळे, नेत्या

  • डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार

  • रवींद्र वायकर, खासदार

  • मिलिंद देवरा, राज्यसभा खासदार

  • राहुल शेवाळे, माजी खासदार

  • संजय निरुपम, माजी खासदार

  • प्रकाश सुर्वे, आमदार

  • अशोक पाटील, आमदार

  • मुरजी पटेल, आमदार

  • दिलीप लांडे, आमदार

  • तुकाराम काते, आमदार

  • मंगेश कुडाळकर, आमदार

  • मनिषा कायंदे, आमदार

  • सदा सरवणकर, माजी आमदार

  • यामिनी जाधव, माजी आमदार

  • दीपक सावंत, माजी आमदार

  • शिशिर शिंदे, माजी आमदार

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा सीपी राधाकृष्णन यांनी दिला राजीनामा; गुजरातच्या राज्यपालांकडे अतिरिक्त कारभार

नेपाळमध्ये अडकले ४४ नाशिककर पर्यटक; कळवण तालुक्यातील ४० तर नाशिकमधील ४ जण संकटात!

Asia Cup 2025 : भारत-पाकिस्तान मॅच रद्द करण्यास SC चा नकार, याचिकेवर तातडीने सुनावणीची मागणी फेटाळली

बॉम्बे नाही, मुंबईच! कपिल शर्माला मनसेची सक्त ताकीद; नाहीतर...

शाहरुख खान-दीपिका पदुकोण यांना मोठा दिलासा; राजस्थान उच्च न्यायालयाकडून FIR चौकशीला स्थगिती