मुंबई

राष्‍ट्रपतीपदाच्या निवडणूकीत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्या,शिवसेना खासदार राहुल शेवाळेंची ठाकरेंकडे मागणी

प्रतिनिधी

राष्‍ट्रपतीपदाची निवडणूक १८ जुलै रोजी होणार आहे. यात भाजप प्रणित रालोआच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्या, अशी मागणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केली आहे. तशी मागणी करणारे पत्रच राहुल शेवाळे यांनी लिहिले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेतील इतरही काही खासदारांची हीच भूमिका असल्‍याचे समजते.

राष्‍ट्रपतीपदाची निवडणूक १८ जुलै रोजी होणार आहे. रालोआतर्फे द्रौपदी मुर्मू या उमेदवार असतील तर त्‍यांच्यासमोर यशवंत सिन्हा यांची उमेदवारी आहे. द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातील असून सामाजिक क्षेत्रात त्‍यांचे बहुमुल्‍य योगदान आहे. राजकारणात येण्यापूर्वी त्‍या शिक्षिका होत्‍या. झारखंडच्या राजयपाल म्‍हणून देखील त्‍यांनी कामगिरी पार पाडली आहे. याआधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना-भाजपा युती असताना रालोआच्या उमेदवाराला पाठिंबा न देता राष्‍ट्रपती निवडणुकीत प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला होता. या पार्श्वभूमीवर द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा दयावा, अशी मागणी करणारे पत्रच राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे.

शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केल्‍यानंतर आता उदधव ठाकरे यांच्यासमोर खासदारांचा हा नवा पेच निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे आता यावर कोणती भूमिका घेणार त्‍यावर शिवसेनेचे उर्वरित खासदार काय निर्णय घेतील हे पुढच्या दिवसांतच स्‍पष्‍ट होणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रात कोणाचा गुलाल? मतदारांमध्ये उत्सुकता, मुद्यांवरून गुद्यांवर चर्चा

Youtuber Elvish Yadav: एल्विश यादवला आणखीन एक झटका, मनी लॉन्ड्रिंगचा खटला दाखल, ED करणार चौकशी!

काय सांगता! Bajajनं आणली चक्क CNG BIKE, 'या' दिवशी होणार लॉन्च

"दिलेला शब्द पाळला नाही"; उमेदवारी नाकारल्याने खासदार गावित नाराज

वाढत्या उन्हाचा वाहतूक पोलिसांना फटका; वाहतूक नियमांची अंमलबजावणी करताना उडतेय तारांबळ