मुंबई

श्लोका आणि आकाश अंबानी यांना कन्यारत्न

आज (31 मे) श्लोका अंबानीने एका गोड मुलीला जन्म दिला आहे.

नवशक्ती Web Desk

अंबानी कुटुंबात एका गोड परीचं आगमन झालं आहे. उद्योगपती मुकेश अंबानी आणि उद्योजिका नीता अंबानी हे पुन्हा एकदा आजी-आजोबा झाले आहेत. मुकेश अंबानी यांची मोठी सून श्लोका अंबानीने काही महिन्यांपूर्वी गरोदर असल्याची गोड बातमी सांगितली होती. काही दिवसांपूर्वी तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम देखील पार पडला होता. तसंच श्लोका अंबानीचे मॅटर्निटी फोटोशूटचे फोटोही खूप व्हायरल झाले होते. आज (31 मे) श्लोका अंबानीने एका गोड मुलीला जन्म दिला आहे. श्लोका ही मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानीची पत्नी आहे. श्लोका आणि आकाश अंबानी यांच्या लेकीच्या जन्माने अंबानी कुटुंबात आनंदाचे वातावरण तयार झालं आहे.

आकाश अंबानी आणि श्लोका अंबानी यांचं 2019 साली लग्न झालं होतं. यानंतर 2021 साली श्लोकाने पहिल्या मुलाला जन्म दिला होता. पृथ्वी असं या बाळाचं नाव ठेवण्यात आलं होतं. आता पु्न्हा एकदा श्लोका आणि आकाश हे आई बाबा झाले आहेत. काही दिवसांपूर्वी अंबानी कुटुंबीयांनी सिद्धिविनायक गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतलं होतं.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन