मुंबई

सायन रुग्णालयात धक्कादायक घटना; टॉयलेटमधील कचरा पिशवीत आढळला नवजात बालिकेचा मृतदेह

शीव पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

नवशक्ती Web Desk

मुंबईतील सायन रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सायन रुग्णालयातील टॉयलेटरुमध्ये एका नवजात बालिकेचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती रुग्णालयात पसरताच मोठी खळबळ उडाली. जन्म झाल्यानंतर या बालिकेला टॉयलेटमध्ये असलेल्या कचऱ्यांच्या पिशवीत फेकून दिल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ८ डिसेंबरच्या सकाळी टॉयलेट साफ करण्यासाठी आलेल्या महिलेला या घटनेबाबत माहिती मिळाली. त्या नेहमी प्रमाणे रुम साफ करण्यासाठी आल्या होत्या. टॉयलेटमधील कचरा पिशवी गोळा करत असताना त्यांना एक पिशवी जड असल्याचं जाणवलं. यानंतर त्यांनी पिशवी उघडून पाहिल्यावर त्यात नवजात बालिकेचा मृतदेह आढळून आला. हे बघताच त्यांनी धक्का बसला. त्यांनी तात्काळ रुग्णलयातील वरिष्ठांना याबाबत माहिती दिली.

डॉक्टरांनी बालिकेला तपासले असताना तीचा मृत्यू झाला असल्याचं कळालं. या घटनेची संपूर्ण माहिती शीव पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिस यासंदर्भात चौकशी करत आहे. यासंदर्भा अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Mumbai : मालाडवासीयांच्या मदतीसाठी कंट्रोल रूम; वायफाय आधारित आधुनिक कॅमेऱ्यांची नजर, पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीत ठरणार उपयुक्त

Mumbai : प्रकल्पबाधितांना मुलुंडमध्ये मिळणार घरे; एक हजार ‘पीएपी’ घरे ऑगस्टपर्यंत तयार, मुलुंडमधील प्रकल्प मार्च २०२९ पर्यंत पूर्ण करणार

Mumbai : कुर्ल्यात जलवाहिनी बिघाडाचा फटका; दुरुस्ती पूर्ण, तरीही अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठ्याची शक्यता

तीन वर्षीय विधी CET प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर; ४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण, प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार

५० इकोफ्रेंडली गणेशमूर्ती अमेरिकेकडे रवाना; साडेसहा फूट उंच भव्य मूर्ती न्हावाशेवा बंदरातून परदेशी वारीला