संग्रहित छायाचित्र
मुंबई

मुंबई, ठाण्यात पावसाच्या सरीवर सरी; रेल्वे, रस्ते वाहतूक मंदावली, आज ‘यलो अलर्ट’

मुंबईत शुक्रवार रात्रीनंतर पावसाचा जोर वाढला असून शनिवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती.

Swapnil S

मुंबई : मुंबईत शुक्रवार रात्रीनंतर पावसाचा जोर वाढला असून शनिवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. सतत बरसणाऱ्या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. परिणामी रस्ते वाहतुकीचा वेग मंदावला तर रेल्वे वाहतूक संथ गतीने सुरू होती. दरम्यान, येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज असून मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्गला 'यलो अलर्ट' तर रायगड, रत्नागिरीला ‘ऑरेंज’ अलर्ट कुलाबा हवामान विभागाने जारी केला.

जून महिना पावसाविना गेल्याने मुंबईकरांना दमदार पावसाची प्रतीक्षा होती. जुलै सुरू झाल्यानंतर पाऊस सरी जोरदार कोसळायला सुरुवात झाली. दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला. गेल्या चार-पाच दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस कोसळतो आहे. शनिवारी पहाटेपासून पावसाने संततधार सुरू असून मुंबई व उपनगरांतील सखल भागात पाणी साचले. अंधेरी सबवे, मालाड सबवे, एलबीएस मार्गावर पाणी साचल्याने येथील वाहतुकीवर परिणाम झाला. भांडुप, घाटकोपर, दादर टीटी, लालबाग, भायखळा, अंधेरी, मालाड, वांद्रे, नाना चौक, गोवंडी-मानखुर्द, चेंबूर शेल कॉलनी, चुनाभट्टी, सायन गांधी मार्केट, चुनाभट्टी, वडाळा आदी सखल भागात पाणी साचले. द्रुतगती मार्गावर पाणी साचल्याने वाहतूककोंडी झाली. त्यामुळे अनेक प्रवाशांना कामावर जाण्यासाठी विलंब झाला.

शनिवारी पहाटेपासून पाऊस धो धो बरसल्यानंतर दुपारनंतर अधूनमधून सरी कोळसत होत्या. त्यामुळे अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा झाला. काही ठिकाणी पावसामुळे पडझडीच्या घटना घडल्या. पूर्व व पश्चिम उपनगरात झाडे व फांद्या कोसळल्याच्या काही घटना घडल्या. मात्र यात कोणीही जखमी झाले नाही.

पावसाची नोंद -, शहर - ६३.३५ मिमी

पूर्व उपनगर - ४९.६८ मिमी

पश्चिम उपनगर - ३८.१८ मिमी

येथे पाणी साचले

अंधेरी सबवे, मालाड सबवे, एलबीएस मार्ग, भांडुप, घाटकोपर, दादर टीटी, लालबाग, भायखळा, अंधेरी, मालाड, वांद्रे, नानाचौक, गोवंडी-मानखुर्द, चेंबूर शेल कॉलनी, चुनाभट्टी, सायन गांधी मार्केट, चुनाभट्टी, वडाळा आदी.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी