रवींद्र वायकर  संग्रहित छायाचित्र
मुंबई

श्याम नगर ते पश्चिम द्रुतगती महामार्ग घेणार मोकळा श्वास; रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा मार्चमध्ये कामाचा शुभारंभ - रवींद्र वायकर

जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड येथील श्याम नगर ते पश्चिम द्रुतगती महामार्गपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Swapnil S

मुंबई : जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड येथील श्याम नगर ते पश्चिम द्रुतगती महामार्गपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. या मार्गावर अडथळा ठरणारी बांधकामे निष्कासित करण्यात येणार असून मार्चमध्ये कामाचा शुभारंभ होईल, अशी माहिती मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील खासदार रवींद्र वायकर यांनी दिली. या कामासाठी वायकर यांनी सतत पाठपुरावा केल्याने येथील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

भविष्यातील जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील होणारी वाहतुकीची होणारी कोंडी लक्षात घेऊन खासदार रवींद्र वायकर यांनी स्थायी समितीवर असताना त्यांनी जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडच्या रुंदीकरणाचे काम सुरू केले. हे काम श्याम नगर तलावपर्यंत पूर्ण करण्यात आले. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे तसेच मेट्रोच्या कामामुळे श्याम नगर ते पश्चिम द्रुतगती महामार्ग या रस्ता रुंदीकरणाचे काम रखडले होते. खासदार रवींद्र वायकर यांनी हे काम सुरू करण्यासाठी मेट्रो व मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी यांच्या समवेत बैठकाही घेतल्या होत्या. या बैठकीमुळे येथील उर्वरित रस्ता रुंदीकरणाचे काम लवकरच सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

श्याम नगर ते पश्चिम द्रुतगती महामार्ग पर्यंतच्या रस्त्याची लांबी ८०० मीटर आहे. याठिकाणी दक्षिण भागात ५६ बांधकामे तर उत्तरेकडे ९६ बांधकामे बाधित होणार आहे. सुरुवातील दक्षिण भागातील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम करण्यात येणार असून यासाठी ५६ बांधकामांना (प्रकल्पबाधित) नोटिसा महानगरपालिकेमार्फत देण्यात येणार आहे. या कामाचे ड्राफ्ट अनेक्श्चर तयार असून अंतिम यादी बनवण्याचे काम प्रगतिपथावर असून हे काम येत्या २० दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता: जुळ्या बोगद्यांच्या बांधणीचा मार्ग मोकळा

दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच, मुंबई पोलीस ठाम ; भूमिका स्पष्ट करण्याचे राज्य सरकारला निर्देश