Mumbai : सिद्धिविनायक मंदिरामध्ये अनुकंपा तत्त्वावर नोकरी संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : सिद्धिविनायक मंदिरामध्ये अनुकंपा तत्त्वावर नोकरी

प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या सेवेत असताना अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास अथवा गंभीर आजार किंवा अपघातामुळे वैद्यकीयदृष्ट्या कायमस्वरूपी अपात्र ठरून सेवेतून निवृत्त झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Swapnil S

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या सेवेत असताना अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास अथवा गंभीर आजार किंवा अपघातामुळे वैद्यकीयदृष्ट्या कायमस्वरूपी अपात्र ठरून सेवेतून निवृत्त झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एका पात्र नातेवाईकाला शैक्षणिक पात्रता आणि वयानुसार गट-क किंवा गट-ड पदावर अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याच्या नियमावलीस राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

विधि आणि न्याय विभागाने गुरुवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला. राज्य सरकारच्या २०२५ च्या सर्वसमावेशक सुधारित अनुकंपा नियुक्ती धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. अनुकंपा नियुक्तीसाठी विहित मुदतीनंतर कमाल दोन वर्षांच्या कालावधीत अर्ज सादर झाल्यास विलंब माफ करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे असतो. मात्र, सिद्धिविनायक न्यासाच्या बाबतीत हा अधिकार विधी आणि न्याय विभागाकडे राहणार आहे.

गटक आणि गट ड पदांसाठी स्वतंत्र प्रतीक्षा यादी ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. ही यादी न्यासाचे नियुक्ती प्राधिकारी अर्थात कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावर ठेवण्यात येणार आहे. प्रतीक्षा यादीतील गट बदलणे तसेच यादीतील नाव बदलण्याचे अधिकार विधि आणि न्याय विभागाकडे राहतील. तसेच अनुकंपा नियुक्तीबाबतचा सहामाही अहवाल कार्यकारी अधिकाऱ्यांना विहित नमुन्यात विधि आणि न्याय विभागाकडे सादर करावा लागणार आहे.

स्थायी, अस्थायी कर्मचाऱ्यांनाही लागू

ही नियमावली न्यासाच्या आस्थापनेवर काम करणाऱ्या स्थायी आणि अस्थायी अधिकारी-कर्मचाऱ्यांना लागू राहणार आहे. न्यासाच्या आस्थापना सूचीवर विहित पद्धतीने नियुक्त झालेले अधिकारी-कर्मचारी या तरतुदीच्या कक्षेत येणार आहेत. अनुकंपा नियुक्तीसाठी रिक्त पदांची गणना करताना निवडसूची वर्ष १ सप्टेंबर ते ३१ ऑगस्ट असे निश्चित करण्यात आले आहे. नियुक्तीचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर संबंधित कार्यालयाने त्याची संपूर्ण छाननी करावी.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

नेपाळमध्ये ३०० भारतीय बेपत्ता; महापुरातील मृतांची संख्या ३५९; राज्यातील ११४ पर्यटक अडकले, ५३ पर्यटक सुरक्षित

शासन व्यवहारासाठी राज्य सहकारी बँकेची निवड

Ganpati Special Train : गणेशोत्सवासाठी आणखी ४ विशेष गाड्या; उद्यापासून आरक्षण सुरू, पाहा संपूर्ण वेळापत्रक

मुंबईचा पुढील महापौर शिवसेनेचा; एकनाथ शिंदेंची घोषणा, भाजपमध्ये चलबिचल 

'मराठी'साठी एक वर्षाची मुदतवाढ; फडणवीसांची घोषणा; रिक्षा-टॅक्सीचालकांना दिलासा, मुख्यमंत्र्यांची शिवसेना शिंदे गटावर कुरघोडी?