मुंबई

Mumbai : भाविकांनो लक्ष द्या...उद्यापासून ५ दिवस श्री सिद्धिविनायकाचे थेट दर्शन बंद; आजच्या अंगारकी संकष्टीनिमित्तही विशेष व्यवस्था

या कालावधीत भाविकांना श्रीच्या प्रत्यक्ष मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही, परंतु या कालावधीत श्रींच्या प्रतिमूर्तीचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे.

Krantee V. Kale

मुंबई : श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरातील ‘श्री’च्या मूर्तीला बुधवार, ७ ते रविवार, ११ जानेवारी या ५ दिवसांच्या कालावधीत सिंदूर लेपन करण्यात येणार आहे. या कालावधीत भाविकांना श्रीच्या प्रत्यक्ष मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही, परंतु या कालावधीत श्रींच्या प्रतिमूर्तीचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. सोमवार, १२ जानेवारीला श्रींच्या मूर्तीचे प्रोक्षणविधी, नैवेद्य व आरती झाल्यानंतर दुपारी १ वाजता भाविकांना नेहमीप्रमाणे गाभाऱ्यातून श्रीचे दर्शन घेता येणार आहे, अशी माहिती श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने एका पत्रकाद्वारे दिली आहे.

अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांसाठी विशेष रांगांची व्यवस्था

श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने मंगळवार, ६ जानेवारीला येणाऱ्या अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांसाठी विशेष रांगेची व्यवस्था केली आहे. संकष्टी चतुर्थी ही हिंदू पंचांगातील कृष्ण पक्षातील पौर्णिमेनंतर येणाऱ्या चौथ्या दिवशी साजरी केली जाते. माघ महिन्यातील कृष्ण चतुर्थी तिथी मंगळवार, ६ जानेवारीला सकाळी ८.०१ वाजता सुरू होऊन बुधवार, ७ जानेवारीला सकाळी ६.५२ वाजता संपणार आहे. ही २०२६ सालातील पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी असून भाविकांसाठी अनेक विशेष रांगांची व्यवस्था करण्यात येणार आहे. मंदिरातील दर्शनासाठी पुरुष आणि महिलांसाठीची सामान्य रांग रवींद्र नाट्य मंदिरापासून सुरू होईल. महिलांसाठीची विशेष रांग राजे संभाजी महाराज मैदानातील रवींद्र नाट्य मंदिर पॅव्हेलियनमधून सुरू होईल. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गर्भवती महिला आणि नवजात बालकांसह असलेल्या पालकांसाठी स्वतंत्र रांगा असतील. मुख दर्शनाची रांग एस. के. बोले मार्ग, आगर बाजार, सिद्धी प्रवेशद्वार, मंदिर प्रवेशद्वार क्रमांक ७ येथून सुरू होईल. राजे संभाजी महाराज मैदानावर पादत्राणे ठेवण्यासाठी मोफत व्यवस्था असेल.

आजची संकष्टी अधिक शुभ

संकष्टी म्हणजे अडचणींचा अंत. हा दिवस विघ्नहर्ता भगवान गणेशांना समर्पित आहे. जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते, तेव्हा तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. चतुर्थी आणि मंगळवार (अंगारक) यांचा योग गणेशांच्या जन्मकथेशी संबंधित असल्याने, भाविक अंगारकी संकष्टीला नेहमीच्या संकष्टीपेक्षा अधिक शुभ मानतात.

भारतावर आता ५०० टक्के टॅरिफ? ट्रम्प प्रशासन 'रशियावरील निर्बंध' विधेयकाद्वारे पुन्हा झटका देण्याच्या तयारीत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास; “मुंबईचा महापौर मराठी हिंदू...

"हॉटेलमध्ये बोलावले अन्..."; अल्पवयीन नेमबाज युवतीचा राष्ट्रीय प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

Mumbai : कांदिवलीमध्ये ट्रेडिंगच्या बहाण्याने व्यावसायिकाची लाखोंची फसवणूक; भावाला अटक, बहीण फरार

Bigg Boss Marathi 6 : श्रेयस तळपदे जाणार 'बिग बॉस'च्या घरात? अभिनेत्याने स्वतःच सांगितलं, "लोक प्रसिद्धीसाठी काहीही करतात"