मुंबई

मध्य रेल्वेवर सहावी वातानुकूलित लोकल दाखल

देवांग भागवत

मध्य रेल्वेच्या ताफ्यात मागील आठवड्यात आणखी एक वातानुकूलित लोकल दाखल झाली आहे. रेल्वेच्या चेन्नईतील इंटिग्रल कोच कारखान्यात तयार झालेली ही लोकल मध्य रेल्वेवरील सहावी लोकल असून सध्या सेवेतील सामान्य लोकल ऐवजी या वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचा विचार मध्य रेल्वेकडून केला जात आहे.

मध्य रेल्वेच्या ताफ्यात पाच वातानुकूलित लोकल असून त्यापैकी चार लोकल सेवेत असतात. तर एक लोकल राखीव ठेवली जाते. सध्या सीएसएमटी ते कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा दरम्यान वातानुकूलित लोकल प्रवाशांच्या सेवेत आहेत. या लोकलच्या दररोज ५६ फेऱ्या होतात. यातील काही लोकल फेऱ्यांना चांगला प्रतिसाद आहे. अल्प प्रतिसादमुळे हार्बर आणि ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बरवरील वातानुकूलित लोकल सेवा बंद करण्यात आली आहे. दरम्यान, मध्य रेल्वेवर आता आणखी एक वातानुकूलित लोकल ताफ्यात दाखल झाली आहे. या लोकलची वैशिष्ट्ये ताफ्यात असलेल्या इतर वातानुकूलित गाड्यांसारखीच आहेत. मध्य रेल्वे मार्गावर सामान्य लोकलच्या सध्या सुरु असलेल्या दहा ते बारा फेऱ्या रद्द करून वातानुकूलित लोकल फेऱ्या चालवण्याचा विचार प्रशासन करत असल्याचे बोलले जात आहे.

... तर तुम्हाला नक्कीच सुवर्णपदक मिळेल; फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवारांचा टोला

अमित शहांच्या भाषणाचा एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल, FIR दाखल

विनातिकिट प्रवास हा गुन्हाच- हायकोर्ट; उच्चपदस्थ अधिकाऱ्याला तूर्तास दिलासा

माढ्यात फडणवीसांनीही टाकला डाव; अभिजित पाटील, धवलसिंह भाजपच्या गळाला?

दक्षिण भारतात पाण्याची भीषण टंचाई, केवळ १७ टक्के जलसाठा; महाराष्ट्र, गुजरातमध्येही परिस्थिती भीषण