दक्षिण मुंबईतील पार्किंगची समस्या होणार दूर; आणखी एक भूमिगत रोबोटिक पार्किंगची सुविधा  'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

दक्षिण मुंबईतील पार्किंगची समस्या होणार दूर; आणखी एक भूमिगत रोबोटिक पार्किंगची सुविधा

दक्षिण मुंबईतील पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी आता आणखी एक रोबोटिक पार्किंगची सुविधा उपलब्ध करणार आहे. काळा घोडा येथील रिदम हाऊसच्या जवळ भूमिगत रोबोटिक पार्किंगची सुविधा असणार आहे. या ठिकाणी भूमिगत रोबोटिक पार्किंगची उपलब्ध करणे शक्य आहे का, याचा अभ्यास करण्यासाठी पालिका सल्लागाराची नियुक्ती करणार आहे.

Swapnil S

मुंबई : दक्षिण मुंबईतील पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी आता आणखी एक रोबोटिक पार्किंगची सुविधा उपलब्ध करणार आहे. काळा घोडा येथील रिदम हाऊसच्या जवळ भूमिगत रोबोटिक पार्किंगची सुविधा असणार आहे. या ठिकाणी भूमिगत रोबोटिक पार्किंगची उपलब्ध करणे शक्य आहे का, याचा अभ्यास करण्यासाठी पालिका सल्लागाराची नियुक्ती करणार आहे.

मुंबईत वाहनांची संख्या ४४ लाखांच्या घरात पोहोचली आहे. वाहनांची वाढती संख्या व रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग यामुळे वाहतूककोंडी व पार्किंगची समस्या उद्भवत आहे. पालिकेची उपलब्ध ३२ वाहनतळांवर ही व्यवस्था पुरेशी ठरत नाही. वाहतूककोंडी आणि बेकायदा वाहन पार्किंग यावर उपाय म्हणून पार्किंग धोरण राबवण्यात येत आहे. यामध्ये जास्तीत जास्त वाहनतळ बांधण्यात येत आहेत.

सर्वेक्षण करणार

कुलाबा, फोर्ट परिसरात खासगी, सरकारी कार्यालयांची संख्या मोठी आहे तसेच अनेक पर्यटकांच्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. पार्किंगची मागणी पाहता हुतात्मा चौकातील अप्सरा पेन शॉपजवळील बहुस्तरीय रोबोटिक सार्वजनिक भूमिगत पार्किंग उभारण्याचा निर्णय घेतला. या पार्किंगमध्ये १९४ चारचाकी वाहने उभी करण्याची क्षमता असणार आहे. हुतात्मा चौकातील सुविधेमध्ये चार भूमिगत स्तर असतील. लिफ्टद्वारे कार पार्किंगमध्ये प्रवेश करतील. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. आता या पाठोपाठ काळा घोडा येथील रिदम हाऊसच्या जवळ रोबोटिक पार्किंग उभारण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. रिदम हाऊसच्या जवळ रोबोटिक पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

Mumbai : गोरेगाव-मुलुंड २० मिनिटांत; जीएमएलआर प्रकल्पात ‘तुळशी’ खोदणार बोगदा, नॅशनल पार्कखाली भूमिगत बोगदा

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : मुख्य आरोपी सचिन अंदूरेला जामीन; जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती, HC चा मोठा निर्णय

बापरे! मध्यान्ह भोजनात मिठाऐवजी चक्क डिटर्जंट? जेवणानंतर २४ हून अधिक विद्यार्थी रुग्णालयात दाखल, VIDEO

संतापजनक! पालघरमध्ये १० वर्षांच्या मुलीवर ५० वर्षीय काकाकडून अत्याचार; FIR नोंदवण्यास पोलिसांची टाळाटाळ? कुटुंबीयांचा गंभीर आरोप

Mumbai : चर्चगेट येथील मुलींच्या हॉस्टेलमधील पाणीटंचाईची हायकोर्टाकडून दखल; महापालिका आणि विद्यापीठाला नोटीस