Mumbai : फनेल झोन बाधित इमारतींच्या पुनर्विकासाला गती द्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश (Photo-X/@CMOMaharashtra)
मुंबई

Mumbai : फनेल झोन बाधित इमारतींच्या पुनर्विकासाला गती द्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या फनेल झोनमधील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाचे बदल केले आहेत.

Swapnil S

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या फनेल झोनमधील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाचे बदल केले आहेत. या फनेल झोनमध्ये सांताक्रूझ, विलेपार्ले, कुर्ला येथील इमारतींचा समावेश आहे. या इमारतींच्या पुनर्विकासाला संबंधित यंत्रणांनी गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे दिले. यासोबतच जुहू येथील मिलिटरी ट्रान्समिशन स्टेशन निर्बंधाने बाधित असलेल्या इमारतींचाही पुनर्विकास कार्यवाहीला वेग द्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

विमानतळ फनेल झोन आणि जुहू मिलिटरी ट्रान्समीटर स्टेशन निर्बंध बाधित इमारतींबाबत आज विधान भवनात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना फडणवीस म्हणाले, फनेल क्षेत्रातील निर्बंध बाधित इमारतींच्या संदर्भात चटई निर्देशांक (एफएसआय) चे 'पोटेन्शिअल' कुठे द्यायचा आहे, याबाबत महापालिकेने निर्णय घ्यावा. देण्यात येणारा चटई निर्देशांक कुठे वापरायचा आहे, याबाबत ठरविण्यात यावे. बाधित इमारतींच्या पुनर्विकासासाठी रस्त्याच्या रुंदीनुसार उच्चस्तरीय 'पोटेन्शिअल' असणारा चटई निर्देशांक देण्यात यावा.

मुंबईत झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण, म्हाडा, सिडको अशा विविध यंत्रणांच्या माध्यमातून गृहनिर्माणाचे कार्य होत असते. या संपूर्ण यंत्रणांचे नियमन आणि नियंत्रण नगरविकास विभागाने करावे. फनेल झोन निर्बंध बाधित इमारतींच्या पुनर्विकासाबाबत महापालिकेने ‘मॅपिंग’ करावे. जुहू येथील मिलिटरी ट्रान्समिशन निर्बंध असलेल्या इमारतींची पुनर्विकास कार्यवाही गतीने पूर्ण करावी.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Nepal Earthquake : नेपाळमध्ये भूकंप; भारतासह 'या' देशांनाही धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

हेपेटायटिस-बीचा वाढता धोका! रुग्णसंख्येत चार वर्षांत जवळपास दुपटीने वाढ; नव्या रुग्णांत ९६ टक्के वाढ

ताजमहालची सहल आटोपून परतणाऱ्या विद्यार्थ्यांवर काळाचा घाला! उभ्या स्कूल बसला ट्रकची धडक; ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू, ३२ जखमी

Mumbai : भाडेतत्त्वावरील बसगाड्यांचे होणार परफॉर्मन्स ऑडिट! आर्थिक तोटा व सुरक्षेच्या प्रश्नांमुळे कंत्राटांचा फेरआढावा

'हापूस'वर गुजरातचा डोळा; नावावर वलसाडची दावेदारी, बाजारपेठ काबीज करण्याचा डाव