प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

कर्नाक पुलाच्या कामाला वेग! ५ जून २०२५ पासून होणार वाहतुकीसाठी खुला

मशीद बंदर रेल्वे स्थानक परिसरात पी. डीमेलो मार्गाला जोडणाऱ्या १५४ वर्षे जुन्या कर्नाक पुलाची पुनर्बांधणी सध्या महापालिकेमार्फत सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत ५१६ मेट्रिक टन वजनाची दक्षिण बाजूची लोखंडी तुळई रेल्वे भागावर स्‍थापित करण्‍याची कार्यवाही पूर्ण झाली.

Swapnil S

मुंबई : मशीद बंदर रेल्वे स्थानक परिसरात पी. डीमेलो मार्गाला जोडणाऱ्या १५४ वर्षे जुन्या कर्नाक पुलाची पुनर्बांधणी सध्या महापालिकेमार्फत सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत ५१६ मेट्रिक टन वजनाची दक्षिण बाजूची लोखंडी तुळई रेल्वे भागावर स्‍थापित करण्‍याची कार्यवाही पूर्ण झाली आहे, तर दुसऱ्या बाजूच्‍या लोखंडी तुळई (गर्डर) चे ४२८ मेट्रिक टन म्हणजेच ८३ टक्‍के सुटे भाग प्रकल्‍पस्‍थळावर दाखल झाले आहेत. तर, उर्वरित सुटे भाग दिनांक २० डिसेंबर २०२४ पर्यंत प्रकल्‍पस्‍थळी दाखल होण्याची शक्यता आहे.

पालिकेच्या वतीने तुळईच्‍या सुटे भागांचे जोडकाम, तुळई स्थापित करण्याची कार्यवाही, अप्रोच रोडवरील बांधणी, लोड टेस्‍ट या कामकाजाचे नियोजन करून पालिका वेळापत्रक ठरवणार आहे. दरम्यान, अपेक्षित काम पूर्ण झाल्यास मुंबईकरांसाठी ५ जून २०२५ पासून म्हणजेच सहा महिन्यांनी कर्नाक पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

मशीद बंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे. लोकमान्य टिळक मार्गावरील कर्नाक पूल धोकादायक झाल्यामुळे दोन वर्षांपूर्वी हा पूल पाडण्यात आला. या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम पालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

रेल्‍वे मार्गावर तुळई स्‍थापित करण्‍याची कार्यवाही पूर्ण झाल्‍यानंतर पालिकेकडून पुढील कामकाजाचे सूक्ष्‍म नियोजन करून टप्‍पेनिहाय किती कालावधी लागेल, याची निश्चिती केली आहे. त्‍यानुसार, पूर्व आणि पश्चिम दिशेच्‍या ॲप्रोच रोडसाठी खांब बांधणीचा पहिला टप्‍पा दिनांक १५ मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करणे, १७ एप्रिल २०२५ पर्यंत खांब उभारणी पूर्ण करणे आणि १ जून २०२५ रोजी भार चाचणी करण्‍याचे नियोजन आहे. नियोजित वेळापत्रकानुसार काम पूर्ण झाल्‍यास ५ जून २०२५ पर्यंत पूल वाहतुकीस खुला करण्‍याचे पालिकेचे प्रयोजन असल्याचे अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

नेपाळ सरकारने सोशल मिडियावरील बंदी हटवली; युवकांच्या आंदोलनाला यश

‘लालबागचा राजा’ मंडळावर गुन्हे दाखल करा; अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Stoinis-Sarah Engagement Photos: स्पेनच्या समुद्रकिनारी स्टॉयनिसचा साखरपुडा; फिल्मी स्टाईलमध्ये केलं प्रपोज

Nashik : आश्रमशाळेतील तिसरीच्या विद्यार्थ्याचा उपचाराअभावी मृत्यू; मृतदेह मुख्याध्यापकांच्या टेबलवर आणून निषेध

आशियातील वर्चस्वासाठी आजपासून चुरस! Asia Cup 2025 स्पर्धेत भारतापुढे जेतेपद राखण्याचे आव्हान, बघा सर्व सामन्यांचं वेळापत्रक