मुंबई

सेन्सॉर बोर्डविरोधी राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन; 'चल हल्ला बोल' चित्रपटाचा विनामूल्य ट्रायल शो

बहुजनांची अभिव्यक्ती आणि संस्कृती नाकारणाऱ्या सेन्सॉर बोर्डविरोधात ‘राज्यस्तरीय सेन्सॉर बोर्डविरोधी’ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

Swapnil S

मुंबई : बहुजनांची अभिव्यक्ती आणि संस्कृती नाकारणाऱ्या सेन्सॉर बोर्डविरोधात ‘राज्यस्तरीय सेन्सॉर बोर्डविरोधी’ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील मुंबई मराठी पत्रकार संघात ९ एप्रिलला सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत ही परिषद होणार आहे. याच ठिकाणी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत 'चल हल्ला बोल' या मराठी चित्रपटाचा विनामूल्य ट्रायल शो होईल.

या परिषदेला ज्येष्ठ शोध पत्रकार निरंजन टकले, अभिनेते किरण माने, ज्येष्ठ रंगकर्मी प्रतिभा मतकरी, अभिनेते यशपाल शर्मा, प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक अविनाश दास, ‘चल हल्ला बोल’ चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक महेश बनसोडे, ॲड. नितीन सातपुते, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, आमदार जिग्नेश मेवाणी, लोकशाहीर संभाजी भगत यांनी या परिषदेला आपला पाठिंबा दर्शवला आहे. विविध रिपब्लिकन गट आणि पँथर्स संघटनाही परिषदेत सामील होत आहेत.

'लोकांचे दोस्त' रवी भिलाणे, पत्रकार संजय शिंदे, पँथर सुमेध जाधव, कॉम्रेड सुबोध मोरे, पँथर डॉ. स्वप्नील ढसाळ, कष्टकऱ्यांचे नेते विठ्ठल लाड, ज्योती बडेकर, अभिनेत्री प्रतिभा शर्मा, संगीता ढसाळ, संभाजी ब्रिगेडचे प्रमोद शिंदे आदींच्या पुढाकाराने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला महाराष्ट्राच्या विविध भागातून रंगकर्मी उपस्थित राहणार असून मुंबईकर जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री