मुंबई

एक पुरातन झाड तोडताय? ५६ नवीन झाडे लावा! राज्य वृक्ष प्राधिकरणाचे आदेश

पुरातन वृक्षाचे वय ५६ वर्षांचे आहे. हे झाड तोडायचे असल्यास नुकसानभरपाई म्हणून त्याच जातीच्या झाडाची ५६ झाडे लावायची आहेत,

संजय जोग

ग्रँड रोड रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर प. रेल्वेला नवीन इमारत बांधायची आहे. यासाठी रेल्वेला तीन पुरातन झाडे तोडावी लागणार आहेत. यातील एक झाड तोडायला राज्य वृक्ष प्राधिकरणाने परवानगी दिली आहे. त्या बदल्यात प. रेल्वेला ५६ नवीन झाडे लावण्याचे आदेश प्राधिकरणाने दिले आहेत. हे काम मुंबई महापालिकेमार्फत करायचे आहे.

या प्रस्तावानुसार, पुरातन वृक्षाचे वय ५६ वर्षांचे आहे. हे झाड तोडायचे असल्यास नुकसानभरपाई म्हणून त्याच जातीच्या झाडाची ५६ झाडे लावायची आहेत, तर सिडकोला ७९९ झाडे लावण्याचे आदेश

खारघर येथील गोल्फ कोर्ससाठी ६९ झाडे कापायची आहेत. त्यासाठी त्यांनी प्राधिकरणाकडे परवानगी मागितली होती. ती त्यांना मिळाली असून त्याबदल्यात ७९९ नवीन झाडे लावावी लागणार आहेत. तसेच तोडण्यात येणाऱ्या झाडांच्या जातीची आणखीन ९७१० झाडे त्यांना लावावी लागणार आहेत. सिडको खारघरला नऊ व १८ होलचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे गोल्फ कोर्स उभारत आहे. त्यासाठी सिडकोला झाडे कापावी लागणार आहेत. तसेच या जागेची पाहणी करून झाडांवर किती पक्षांची घरटी आहेत, याचा सर्व्हे करायला सांगितला आहे. तसेच झाडे तोडल्यानंतर किंवा ती झाडे दुसऱ्या ठिकाणी लावल्यानंतर त्याचा अहवाल सादर करायचा आहे.

झाडे तोडण्यासाठी प. रेल्वे व सिडकोने राज्य वृक्ष प्राधिकरणाकडे स्वतंत्र अर्ज केले होते. झाडे तोडल्यानंतर १५ दिवसांत रेल्वे व सिडकोने झाडे लावण्यास सुरुवात करावी. ही झाडे ६ फुटांपेक्षा कमी उंचीची असू नयेत. या झाडांवर जीओ टॅग लावावेत तसेच नवीन तंत्रज्ञानानुसार त्यांच्यावर देखरेख करावी. झाडे किमान ७ दिवस टिकतील याची खात्री करा, या कालावधीतील वृक्षतोडीची भरपाई तितकीच नवीन झाडे लावून केली जाईल, असे प्राधिकरणाने सांगितले.

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

रेल्वे स्टेशनमध्ये दोन दिवस राहा फक्त दहा रुपयांत...आंदोलकांच्या व्हॉट्सअपवर मेसेज व्हायरल, वाशीतील एक्झिबिशन सेंटरमध्ये व्यवस्था

मराठा आंदोलकांनी केला चक्काजाम; जरांगे-पाटील यांच्या आवाहनानंतर रस्ता मोकळा

इशाऱ्यानंतर पालिका प्रशासनाचे नमते! फिरत्या शौचालयासह पुरवल्या इतर सुविधा; आंदोलकांसाठी पाण्याचे टँकर्सही अखेर उपलब्ध