मंगल प्रभात लोढा यांचे संग्रहित छायाचित्र 
मुंबई

मलबार हिलमधील राखीव भूखंडाचा लिलाव थांबवा; आमदार मंगल प्रभात लोढा यांचे आयुक्तांना पत्र

मोकळे भूखंड, उद्यान ही मुंबईची गरज आहे. त्यामुळे मलबार हिल परिसरातील उद्यानासाठी राखीव असलेली जागा व्यापारीकरणासाठी वापरण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : मोकळे भूखंड, उद्यान ही मुंबईची गरज आहे. त्यामुळे मलबार हिल परिसरातील उद्यानासाठी राखीव असलेली जागा व्यापारीकरणासाठी वापरण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.

मुंबई पालिकेच्या या निर्णयास येथील स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमींनी विरोध केला आहे. मलबार हिल विधानसभा क्षेत्राचे स्थानिक आमदार मंगल प्रभात लोढा यांनी या प्रकरणाची बुधवारी दखल घेतली. या मोकळ्या भूखंडाच्या लिलावाची प्रक्रिया थांबवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना लोढा यांनी पत्र लिहिले आहे. 

पालिकेसारख्या नामांकित शासकीय संस्थेकडून राखीव भूखंडाचा व्यापारी करणासाठी लिलाव करण्याचा निर्णय धक्कादायक आहे. ज्या मूळ कारणासाठी सदर भूखंड आरक्षित आहे, त्या कारणासाठी तो वापरला जायला हवा. सदर भूखंडाच्या व्यापारीकरणासाठी नागरिकांनी विरोध केला असून, मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या मागणीचा आदर करावा असे मंगल प्रभात लोढा यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

मलबार हिलमध्ये रमाबाई आंबेडकर मार्गा शेजारील बेस्टचे रिसिव्हिंग स्टेशन असलेला २४३२ स्क्वेयर मीटरचा प्लॉट खाजगी व्यापारासाठी भाड्याने देण्याचा निर्णय महानगरपालिकेकडून घेण्यात आला होता.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री