मुंबई

भक्ता-भक्तांमध्ये भेदभाव का? लालबागच्या राजाचं व्हीआयपी दर्शन बंद करा, मुंबईच्या डबेवाल्यांची मागणी

व्हीआयपींना रेडकार्पेट अंथरुन दर्शन दिलं जात आहे. तर सर्वसामान्य गणेश भक्तांना हाडतूड केल जात असल्याचा आरोप देखील डबेवाल्यांकडून केला जात आहे.

नवशक्ती Web Desk

भक्ता-भक्कांमध्ये भेदभाव न करण्याची आपली संस्कृती सांगते. पण लालबागच्या राजा गणपती मंडळाने सर्रासपणे या नियामाला तिलांजली दिली असून व्हीआयपींना रेडकार्पेट अंथरुन दर्शन दिलं जात आहे. तर सर्वसामान्य गणेश भक्तांना हाडतूड केल जात आहे. हा भेदभाव अयोग्य असून लालबागचा राजाचं व्हीआयपी दर्शन बंद करा, अशी मागणी मुंबईच्या डबेवाल्यांनी केली आहे.

गणेश भक्त गेली २४ तास रांगेत उभ राहुन लालबागच्या राजाने ओझरतं दर्शन घेत आहेत . तर दुसऱ्या बाजूला खास व्यक्तींना व्हीआयपीच्या नावाखाली थेट लालबागच्या राजाच्या पायाजवळ नेऊन दर्शन दिलं जात आहे. याबद्दल मुंबई डबेवाला असोशिएशन अध्यक्ष तळेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

शुक्रवारी उर्फी जावेद या मॉडेलला व्हीआयपीच्या नावाखाली थेट श्रींच्या जरणी दर्शनाला नेण्यात आलं. हे मात्र खटकरणारं आहे. उर्फीचं समाजासाठी देशासाठी काय योगदान आहे. व्यवस्थापकांनी याचं योगदान द्यावं. दर्शनासाठी रांग लावलेल्या भक्तांची ही थट्टा आहे. देवाने भक्ता भक्तांमध्ये भेद केला नाही. मग लालबागचा राजा मंडळ भेद कसं करु शकतं , असा सवाल देखील तळेकर यांनी विचारला आहे. दरम्यान डबेवाल्यांची मुंबईसाठी थोडे का होईना योगदान आहे. जर डबेवाला कामगार लालबागच्या राज्याच्या दर्शनाला आला तर मंडळ त्याला व्हीआयपी दर्शन देईल का? असा सवाल ही तळेकर यांनी उपस्थित केला आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी