मुंबई

प्लास्टिक पिशव्या विकणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार

प्रतिनिधी

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून थंडावलेल्या प्लास्टिक पिशव्यांवरील कारवाईला पुन्हा वेग येणार आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या विक्री करणारे व उत्पादन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. १ जुलैपासून याची अंमलबजावणी होणार असून वॉर्डनिहाय पथके कारवाई करणार असल्याची माहिती उपायुक्त संजोग कबरे यांनी दिली.

२६ जुलै, २००५मध्ये मुंबईत आलेल्या महापुरास प्लास्टिक पिशव्या कारणीभूत असल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर २०१८ मध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या विक्री, वापर करणारे व उत्पादन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर मुंबई महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आणि ८६ हजार किलो प्लास्टिक जप्त केले. तर ४ कोटी ६५ लाखांचा दंड वसूल केला होता.

२०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला. मुंबई महापालिकेतील बहुतांश अधिकारी व कर्मचारी कोरोनाविरोधात लढ्यात सहभागी झाले. सध्या कोरोनाच्या चौथ्या लाटेचा इशारा देण्यात आला असला तरी पुन्हा एकदा प्लास्टिक पिशव्या विक्री वापर करणारे व उत्पादन करणाऱ्यांवर कारवाईचा अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. १ जुलैपासून ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येईल.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला अटक

महिंद्राच्या 'या' नवीन SUV ची जबरदस्त क्रेझ! अवघ्या 1 तासात 50,000 हून अधिक गाड्यांचे बुकिंग! पाहा फीचर्स अन् किंमत

ठाकरे गटाचा पाठिंबा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! ‘एनडीए’ला बहुमत मिळणार; देवेंद्र फडणवीस यांना विश्वास

धक्कादायक! दहा वर्षाच्या चिमुकल्याचा गळा चिरून मृतदेह खाडीत फेकला, हत्येप्रकरणी वडिलांच्या मित्राला अटक

वांद्रे ते मरीन ड्राईव्ह फक्त १२ मिनिटांत! २.५ हजार मेट्रिक टन वजनाचा गर्डर लाँच