मुंबई

पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार सकस आहार

प्रतिनिधी

बेस्टच्या कर्मचाऱ्यांसह पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना बेस्ट भवनातील उपाहारगृहातून मोफत जेवण पुरविण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. उपाहारगृहातच मध्यवर्ती स्वयंपाकघर सुरू करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत आता पालिका शाळांतील विद्यार्थ्यांनाही सकस आहार देण्याची योजना असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

२ मे रोजी बेस्ट उपक्रमाने अक्षय योजना सुरू केली. या योजनेचे उद‌्घाटन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते कुर्ला आगारात झाले. या योजनेच्या माध्यमातून बेस्टमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पौष्टिक आणि सकस आहार पुरविला जाणार आहे.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत