मुंबई

मुंबईत पहिल्यांदाच रंगणार ‘सनबर्न फेस्टिव्हल’; तिकीट विक्री दोन टप्प्यात, कशी कराल बूकिंग?

आशियातील सर्वात मोठा डान्स म्युझिक फेस्टिव्हल म्हणून ओळखला जाणारा ‘सनबर्न फेस्टिव्हल’ यंदा पहिल्यांदाच मुंबईत होणार आहे.

Krantee V. Kale

मुंबई : आशियातील सर्वात मोठा डान्स म्युझिक फेस्टिव्हल म्हणून ओळखला जाणारा ‘सनबर्न फेस्टिव्हल’ यंदा पहिल्यांदाच मुंबईत होणार आहे. गोव्यातील १७ वर्षांची परंपरा मोडून हा फेस्टिव्हल १९, २० आणि २१ डिसेंबर असा तीन दिवस मुंबईत रंगणार आहे.

फेस्टिव्हलचे ठिकाण अद्याप जाहीर करण्यात आले नसले तरी, मुंबईत होणाऱ्या या ऐतिहासिक आयोजनामुळे देशभरातील संगीतप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. २००७ मध्ये गोव्यात वागाटोर येथे सुरू झालेला हा फेस्टिव्हल २०१६ ते २०१८ या कालावधीत पुण्यात रंगला होता. त्यानंतर पुन्हा गोवा आणि आता प्रथमच मुंबईत हा फेस्टिव्हल होणार आहे.

तिकीट बूकिंगसाठी काय कराल?

सनबर्न २०२५ मध्ये सहभागी व्हायचे असेल पण तिकिटे कशी बुक करायची हे माहित नसेल तर...यासाठी तिकीट विक्री दोन टप्प्यात सुरू होईल. एक विशेष प्री-सेल १२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता लाईव्ह होईल, तर सामान्य तिकिटांची विक्री १४ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता 'बुकमायशो'द्वारे सुरू होईल.

Mumbai : 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ होणार कमी

टीएमटीच्या ताफ्यात पहिली डबलडेकर ई-बस दाखल

Pune : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; खंडाळा घाटात वाहनांच्या रांगा, खासदार सुप्रिया सुळेही दोन तास अडकल्या, VIDEO

Navi Mumbai : डीपीशेजारी कचरा टाकू नका, गाड्या पार्क करू नका; महावितरणचे आवाहन

मानखुर्दमध्ये क्रेन दुर्घटना : कंत्राटदाराला एक कोटींचा दंड