भाजपला पाठिंब्याचे वृत निराधार- सुप्रिया सुळे X | ANI
मुंबई

भाजपला पाठिंब्याचे वृत निराधार- सुप्रिया सुळे

केंद्र सरकारच्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पाठिंबा दिला जाणार असल्याचे वृत्त निराधार असल्याचा खुलासा पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी येथे केला. या विधेयकाबाबत पक्षाने अद्याप अधिकृत भूमिका घेतली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Swapnil S

मुंबईः केंद्र सरकारच्या  मतदारसंघ पुनर्रचना  विधेयकाला  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून  पाठिंबा दिला जाणार असल्याचे वृत्त निराधार असल्याचा खुलासा पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी येथे केला. या विधेयकाबाबत पक्षाने अद्याप अधिकृत भूमिका घेतली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 राष्ट्रवादी शरद पवार गट भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होणार असल्याची आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये आहे.  या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेत बोलताना सुळे यांनी या चर्चा फेटाळून लावल्या.

मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाचा नवीन मसुदा अद्याप आमच्याकडे आलेला नाही. विधेयक प्राप्त झाल्यानंतर २४ तासाच्या आत त्याचा अभ्यास करून पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर करण्यात येईल. मतदारसंघ पुनर्रचना २०२६ मध्ये होणार असेल तर  ती  सर्वानुमते  आणि व्यापक चर्चेनंतर व्हावी.  या प्रक्रियेत  कोणत्याही राज्यावर अन्याय होता कामा नये, असेही सुळे म्हणाल्या.

काही माध्यमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर पाठिंबा  देणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्याने महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज होऊ नयेत म्हणून आपण पक्षातील सर्वांशी चर्चा करून स्पष्टीकरण दिले.  तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, सतेज पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे  नेते संजय राऊत यांच्याशीही आपण संवाद साधला आहे. त्यामुळे  पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर होईपर्यंत कोणत्याही चर्चांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी माध्यमांना केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Maharashtra MLC Elections : राज्यातील विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Ganeshotsav 2026 : अवघ्या '१ इंच'चा बाप्पा; शिवलिंगात विराजमान झालेल्या गणरायाचा Video व्हायरल

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

सोनिया गांधी मतदार यादी प्रकरणाला नवे वळण; कायदेशीर त्रुटींमुळे कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द, तक्रारीवर नव्याने सुनावणी