माफी मागणार नाही, शिक्षा भोगण्यास तयार! हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारे यांची भूमिका (संग्रहित छायाचित्र)
मुंबई

माफी मागणार नाही, शिक्षा भोगण्यास तयार! हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारे यांची भूमिका

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आपण कोणतेही विधान केलेले नाही. आपले विधान हे हॅबिटॅट स्टुडिओत झालेल्या तोडफोड करणाऱ्यांविरोधात होते.

Swapnil S

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आपण कोणतेही विधान केलेले नाही. आपले विधान हे हॅबिटॅट स्टुडिओत झालेल्या तोडफोड करणाऱ्यांविरोधात होते. त्यात कोणीही विधिमंडळाचा सदस्य नव्हता. आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आला असून माफी मागणार नाही. हक्कभंग समितीचा आदर ठेवून समितीने कोणतीही शिक्षा दिल्यास ती भोगण्यास तयार असल्याची भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोमवारी हक्कभंग समितीसमोर सुनावणीदरम्यान मांडली.

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबनात्मक गाण्याला पाठिंबा देणारे वक्तव्य केल्यामुळे सुषमा अंधारे यांच्याविरोधात विधान परिषदेत हक्कभंग मांडण्यात आला होता. या हक्कभंगावरील सुनावणी हक्कभंग समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड यांच्यासमोर पार पडली. यावेळी समितीचे सदस्य आमदार प्रवीण दरेकर, मनीषा कायंदे उपस्थित होत्या. या सुनावणीवेळी सुषमा अंधारे यांना त्यांनी कुणाल कामगाराच्या विडंबात्मक गाण्याला पाठिंबा देणाऱ्या समाजमाध्यमावरील संदेश तसेच वक्तव्यावरून स्पष्टीकरण विचारण्यात आले. याला उत्तर देताना अंधारे यांनी आपण केलेले वक्तव्य हे एकनाथ शिंदे यांच्याविषयी नव्हते.

समितीच ते वक्तव्य एकनाथ शिंदे यांच्याविषयी असल्याचे सांगत आहे. आपले वक्तव्य हे हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड करणाऱ्यांविरोधात होते. मात्र, त्याचा विपर्यास करण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी समितीने आपल्यावर होणारी कारवाई ही राजकीय कारणाने होत असल्याचे वाटत आहे का, असे विचारले असता त्याला सुषमा अंधारे यांनी होकार दर्शवला.

अंधारे यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे - लाड

या सुनावणीबद्दल माहिती देताना प्रसाद लाड यांनी सुषमा अंधारे यांनी सुनावणीत केवळ उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे सांगितले. त्यांना २२ ते २३ प्रश्न विचारण्यात आले.

मात्र कोणत्याही प्रश्नाला थेट उत्तर दिले नसल्याची माहिती दिली. पुढील बैठकीत समिती या प्रकरणाचा पुनर्विचार करून निर्णय घेणार असल्याची माहिती लाड यांनी यावेळी दिली.

"व्हिडीओ पाहायला आमच्याकडे वेळ नाही"; CJP आंदोलकांच्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे भाष्य, तातडीच्या सुनावणीस नकार

आता AI ठेवणार पक्ष्यांवर नजर! महाराष्ट्रात उभारलं जाणार देशातील पहिलं AI-आधारित पक्षी अभयारण्य

Mumbai Rains : पावसात अडकलेल्या मुंबईकरांना 'Vi'चा दिलासा! स्टोअरमध्ये घेता येणार आश्रय, मोबाईल चार्जिंगचीही सोय

१८ वर्षीय तरुणाने घातला ६५ कोटींचा गंडा! AI च्या मदतीने बनवले १२१ बनावट अ‍ॅप्स

Mumbai Rain Alert : मुंबईत मुसळधार पावसासह भरतीचाही धोका; वादळी वाऱ्याचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन