सलीम डोला पोलिसांची दिशाभूल करत असल्याचा संशय Photo : X
मुंबई

Mumbai : सलीम डोला पोलिसांची दिशाभूल करत असल्याचा संशय

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केल्यानंतर नुकताच मुंबई गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आलेला कुख्यात अमली पदार्थ तस्कर सलीम डोला हा चौकशीदरम्यान तपास अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

Swapnil S

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केल्यानंतर नुकताच मुंबई गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आलेला कुख्यात अमली पदार्थ तस्कर सलीम डोला हा चौकशीदरम्यान तपास अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

डोला सध्या मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-३ च्या कोठडीत असून त्याची पोलीस कोठडी सोमवारी संपणार आहे. पुढील आदेशासाठी त्याला किल्ला कोर्टात हजर केले जाण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युनिट-३ ने केलेल्या चौकशीत डोला याने असा दावा केला आहे की, अमली पदार्थांच्या तस्करीतून मिळालेल्या पैशातून त्याने दुबईत खरेदी केलेल्या मालमत्ता आधीच विकल्या गेल्या आहेत. तपास अधिकारी आता या दाव्याची पडताळणी करण्याचा आणि त्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक व्यवहारांचा माग काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

डोला तुर्कीमध्ये ‘आयहान शेख’ या नावाने राहत होता; चौकशीदरम्यान हा तपशील उघड झाला. गुन्हे शाखेचे अधिकारी त्याच्या परदेशातील हालचाली, आर्थिक व्यवहाराची तपासणी पोलीस करत आहेत.

मुंबईत पाणीकपात वाढणार? BMC ची राखीव पाण्यासाठी फिल्डिंग, ७ धरणांत फक्त ८२.४७ टक्के पाणी, ६ महिने आधीच राज्य सरकारला पत्र

Mumbai : फटाक्यामुळे लागली आग; विरार-नालासोपारादरम्यान लोकल सेवेला फटका, सिग्नल यंत्रणेत बिघाड; प्रवाशांचे हाल

Mumbai : रेल्वे मार्गालगतच्या घरांवरील कारवाईला स्थगिती द्या! उच्च न्यायालयात याचिका दाखल

Mumbai : जन्मतः अवघ्या ७०० ग्रॅम वजनी बालकाला संजीवनी; KEM रुग्णालयात यशस्वी उपचारांनंतर डिस्चार्ज

Mumbai: फटाके बंदीचा बार फुसका; दोन दिवसांत आगीच्या ८९ घटना, फटाक्यांमुळे २८ ठिकाणी अग्निभडका, एकाचा मृत्यू; तीन जखमी