मुंबई

पोलिसाला शिवीगाळ, मारहाणप्रकरणी टॅक्सीचालक निर्दोष; शिवडी सत्र न्यायालयाचा निकाल

वाहतुकीचे नियम मोडून ड्रायव्हिंग केल्याने जाब विचारल्याच्या रागातून पोलिसाला शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या पाच टॅक्सीचालकांची निर्दोष सुटका झाली.

Swapnil S

मुंबई : वाहतुकीचे नियम मोडून ड्रायव्हिंग केल्याने जाब विचारल्याच्या रागातून पोलिसाला शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या पाच टॅक्सीचालकांची निर्दोष सुटका झाली. सरकारी पक्ष आरोपी टॅक्सीचालकांविरुद्ध सबळ पुरावे सादर करण्यात अपयशी ठरला. पोलिस आणि सरकारी पक्षाच्या याच अपयशावर बोट ठेवत अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. पी. त्रिभुवन यांनी टॅक्सीचालकांना दोषमुक्त केले. इब्राहिम शेख, असिफ शेख, शहबाद खान, अडसर शेख, बुराहुद्दीन शेख अशी आरोपींची नावे आहेत.

तक्रारदार पोलीस नाईक ज्ञानेश्वर मेश्राम हे १४ जानेवारी २०१९ रोजी दुपारी ३.०० वाजता माहीम वाहतूक विभागात कर्तव्य बजावत असताना हा प्रकार घडला. मेश्राम यांनी एका टॅक्सीचालकाला नियम मोडल्याबद्दल रोखण्याचा प्रयत्न केला असता टॅक्सीचालकाने त्यांचे म्हणणे ऐकले नाही आणि भांडण केले. मेश्राम यांना शिवीगाळ आणि मारहाण केली होती.

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना दिलासा! ११ ते २७ सप्टेंबरदरम्यान वाहनांना टोलमाफी

...त्यापेक्षा मृत्यू पत्करेन; न्यायाधीशांचे वक्तव्य

पालघर पो. अधीक्षकांना न्यायालयाने केले पाचारण

मुंबई-सावंतवाडी एक्स्प्रेस उद्यापासून रोज धावणार

नगरसेवकांना एक कोटीचा निधी; BMC सभागृहाची मंजुरी; विकासकामे मार्गी लावण्यासाठी केली वाढ; आयुक्तांच्या अभिप्रायाची प्रतीक्षा