मुंबई

दादर रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळित

सीएसएमटी येणाऱ्या गाड्या २० ते २५ मिनिटे उशिराने धावत होत्या. तर परिणामी दादर स्थानकाच्या पुढे एका पाठोपाठ एक लोकल गाड्या थांबल्या होत्या

प्रतिनिधी

मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकावर गुरुवारी सकाळी ७.३० च्या सुमारास तांत्रिक बिघाड झाल्याने छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली. तर या मार्गिकेवरून लोकल सेवेसोबत एक्स्प्रेस गाड्या देखील खोळंबळ्या. अर्ध्या तासाच्या दुरुस्तीनंतर रेल्वेसेवा सकाळी ८ नंतर पूर्ववत करण्यात आली.      

गुरुवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी सकाळी ७.३० वाजता मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकाच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. यामुळे सीएसएमटीकडे येणाऱ्या जलद मार्गावरील वाहतूक सर्वाधिक विस्कळीत झाली. तर याचा परिणाम धीम्या मार्गावरील वाहतूकीवर देखील झाला. सीएसएमटी येणाऱ्या गाड्या २० ते २५ मिनिटे उशिराने धावत होत्या. तर परिणामी दादर स्थानकाच्या पुढे एका पाठोपाठ एक लोकल गाड्या थांबल्या होत्या. दरम्यान, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने गाड्या उशिराने धावत असल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यानंतर धावणाऱ्या गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली. 

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश